Champions Trophy 2025 : पाकिस्तान पुन्हा झुकणार; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही हायब्रीड मॉडेल? | पुढारी

Champions Trophy 2025 : पाकिस्तान पुन्हा झुकणार; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही हायब्रीड मॉडेल?

दुबई : वृत्तसंस्था : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयसीसी बीसीसीआयवर दडपण आणणार नाही, असे आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल वापरण्यात येणार असल्याची शक्यता आहे. (Champions Trophy 2025)

चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. राजकीय संबंधामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणे जवळपास अशक्य आहे. आयसीसी सूत्राने सांगितले की, भारतीय सरकारची नीती विरोधात असेल तर आयसीसी भारताच्या सहभागाबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळविण्याचा एक पर्याय आहे. बोर्डाच्या बैठकीत प्रत्येक सदस्य आपला मुद्दा मांडतो आणि त्यावर मतदान होते. परंतु, सदस्य देशाच्या सरकारने एखाद्या ठिकाणी खेळण्यास नकार दिला, तर आयसीसीला यासाठी पर्याय शोधावे लागतात. (Champions Trophy 2025)

आशिया चषकात झाला होता अवलंब

आशिया चषक 2023 च्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. परंतु भारताने पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्याने स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले होते. ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळवावी, अशी भारताची मागणी होती, तर स्पर्धा पाकिस्तानातच घेण्यावर पीसीबी ठाम होते. यावर तोडगा म्हणून पाकिस्तानचे सामने पाकिस्तानमध्ये आणि भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्याचे ठरवण्यात आले. जर बाद फेरीत भारत असेल तर तेही सर्व सामने श्रीलंकेत घेण्याचे ठरले. (Champions Trophy 2025)

Back to top button