T20 World Cup 2026 : २०२६ चा टी-२० वर्ल्डकप भारत, श्रीलंकेत होणार | पुढारी

T20 World Cup 2026 : २०२६ चा टी-२० वर्ल्डकप भारत, श्रीलंकेत होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : 2026 मध्ये होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे असल्याचेही जाहीर करण्यात आले. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रता नियमही आयसीसीने जाहीर केले. या नियमांतर्गत 20 संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026 साठी कसे पात्र ठरतील, हे आयसीसीने स्पष्ट केले आहे. (T20 World Cup 2026)

आयसीसीने पुरुषांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026 पात्रता प्रक्रियेलाही मान्यता दिली आहे. 20 संघांचा समावेश असलेला हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाईल आणि एकूण 12 संघ रँकिंग व 2024 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर पात्र ठरतील. 2024 च्या वर्ल्ड कपमधील अव्वल 8 संघ आपोआप 2026 साठी पात्र ठरतील. आयसीसी क्रमवारीच्या आधारे दोन ते चार संघ आपले स्थान निश्चित करतील. (T20 World Cup 2026)

दुसरीकडे भारत आणि श्रीलंका हे दोन्ही यजमान देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरतील. जर भारत आणि श्रीलंका अव्वल 8 संघांमध्ये नसतील तर उर्वरित चार संघांमध्ये भारत आणि श्रीलंकेची नावे प्रथम समाविष्ट केली जातील. त्यानंतर आणखी दोन संघ क्रमवारीच्या आधारे आपले स्थान पक्के करू शकतील. भारत आणि श्रीलंकेने आधीच अव्वल 8 मध्ये आपले स्थान निर्माण केले तर इतर चार संघ क्रमवारीच्या आधारे पात्र ठरतील. 20 पैकी उर्वरित आठ संघ प्रादेशिक पात्रता फेरीतून पात्र ठरतील. (T20 World Cup 2026)

Back to top button