IPL 2024 : ‘या’ तीन संघाना ‘कॅप्टन’ची चिंता, IPL पूर्वी उडाला गोंधळ | पुढारी

IPL 2024 : ‘या’ तीन संघाना ‘कॅप्टन’ची चिंता, IPL पूर्वी उडाला गोंधळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 17 वा (IPL 2024) हंगाम सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक आहे. सर्व संघ जय्यत तयारीला लागले आहेत. यंदाच्या हंगामात अनेक संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरतील. पण, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन फ्रँचायझी आहेत ज्यांना आपल्या संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे याची चिंता सतावत आहे. स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. असताना या तीन संघांचा कर्णधार पद कोण भूषवेल? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये दोन खेळाडू कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहेत. एक श्रेयस अय्यर (shreyas iyer) आणि दुसरा ऋषभ पंत (rishabh pant). हे दोघेही दुखापतीमुळे गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळले नव्हते आणि आता लीगच्या या हंगामात कर्णधार म्हणून कमबॅक करू शकतात. पण, त्यांची भूमिका काय असेल? यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याला दोघांचा फिटनेस कारणीभूत आहे. श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार (KKR Captain) आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार हे निश्चित आहे. पण, त्याआधी तो मुंबईसाठी रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. दुसऱ्या डावातही त्याने 95 धावा केल्या. पण, या काळात त्याच्या पाठीची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली. या कारणास्तव, रणजी ट्रॉफीच्या फायनलच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी तो मैदानात उतरला नाही. त्याला पाठीच्या स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. म्हणजेच त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अय्यरच्या (shreyas iyer) फिटनेसचे केकेआरला टेन्शन

गेल्या वर्षीही श्रेयस अय्यर अनफिट असल्याने नितीश राणाने केकेआरची धुरा सांभाळली होती आणि यंदाही लीग सुरू होण्यापूर्वी त्याच्या दुखापतीच्या बातम्यांनी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच तो यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे केकेआरला अय्यरच्या (kkr shreyas iyer) अनुपस्थितीत नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.

पंत (rishabh pant) दिल्लीचे नेतृत्व करेल की नाही?

दिल्ली कॅपिटल्ससाठी (delhi capitals) आनंदाची बातमी म्हणजे ऋषभ पंत (rishabh pant) तंदुरुस्त झाला आहे. अशा स्थितीत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. पण, तो आयपीएल सामन्यांच्या दबावाला तोंड देण्यासाठी पुरेसा फिट आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असेही वृत्त आहे की पंतवर अतिरिक्त दबाव न आणता फ्रँचायझी त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करू शकते. असे झाल्यास पंत केवळ फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. परिणामी गेल्या वर्षीप्रमाणेच दिल्लीचे नेतृत्व पुन्हा डेव्हिड वॉर्नर सोपवले जाऊ शकते.

केएल राहुलच्या (KL Rahul) फिटनेसवरही प्रश्नचिन्ह

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलच्या (LSG Captain KL Rahul) फिटनेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तो दुखापतीमुळे भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर बाहेर पडला होता. यानंतर तो एनसीएमध्ये फिटनेसवर काम करण्यासाठी गेला. तेथून सावरल्यानंतर तो संघात परतला. पण, दुखापतीची समस्या पुन्हा उद्भवली आणि त्याने उपचारासाठी थेट लंडन गाठले. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरीत चार सामन्यांत टीम इंडियाचा भाग राहिला नाही. आता प्रश्न असा आहे की राहुल दुखापतीतून न सावरल्यास त्याच्या जागी लखनौ संघाची (LSG IPL 2024) धुरा कोण सांभाळणार?

Back to top button