Ranji Final Day 3 : मुशीर-श्रेयसची 150 धावांची भागिदारी | पुढारी

Ranji Final Day 3 : मुशीर-श्रेयसची 150 धावांची भागिदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ४१ वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. मुंबईने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना निर्णायक आघाडी घेतली आहे. (Ranji Final Day 3 )

मुशीर-श्रेयसची 150 धावांची भागिदारी

कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने मुशीर खानसोबत चौथ्या विकेटसाठी 150 धावांची भागिदारी केली आहे. यामध्ये मुशीरने 295 बॉलमध्ये 125 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 106 बॉलमध्ये 96 धावांची खेळी केली आहे.

आपल्या खेळीमध्ये मुशीरने 295 बॉलमध्ये 125 धावांची शानदार खेळी केली आहे. यामध्ये त्याने 9 चौकार लगावले आहेत. तर श्रेयस अय्यरने आपल्या खेळी 106 बॉलमध्ये 96 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. या दोन्ही फलंदाजांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सामन्यात 448 धावांची आघाडी घेतली आहे.

मुंबईकडे दुसऱ्या डावात निर्णायक आघाडी

मंबईचा डाव 224 धावांवर गुंडाळल्यावर या आव्हानाचा पाठलाग करतान विर्दभाला पहिल्या डावात 107 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरेलेल्या मुंबईची सुरूवात पुन्हा खराब झाली. 26 धावांवर पृथ्वी शॉच्या रूपात पहिला तर 36 धावांवर भुपेन लालवणीच्या रूपाने दुसरा धक्का बसला.

यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुशीर खानने अजिंक्य रहाणेसोबत संघाचा डाव सावरत निर्णायक खेळी केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागिदारी केली. अजिंक्य रहाणेने आपल्या खेळीत 143 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावले. 60 व्या ओव्हरमध्ये त्याला ह्रर्ष दुबेने अक्षय वाडकरकरवी झेलबाद केले. तर सध्या मुशीर खान श्रेयस अय्यरसोबत खेळत आहे.

विदर्भाचा पहिला डाव

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला 23 धावा करता आल्या. (Ranji Final 2024)

यानंतर शम्स मुलाणी यांचा कहर पहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला 19, अक्षयला पाच आणि हर्षला 1 धाव करता आली. यानंतर तनुषने 3 गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (27), यश ठाकूर (16) आणि उमेश यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने 3 बळी घेतले. त्याचवेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. शार्दुलला एक विकेट मिळाली.

मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर आटोपला

मुंबईची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. शम्स मुलानी 13 धावा करून बाद झाला.

हेही वाचा : 

Back to top button