

पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीआपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (TMC Yusuf Pathan)
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी बहरमपूरमधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी अधीर रंजनचा सामना बहरामपूरच्या युसूफ पठाणशी होणार आहे. बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीने महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर जगदीश चंद्र बसुनिया यांना कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (TMC Yusuf Pathan)
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच आसनसोलमधून लोकसभा मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले हाेते. आता आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीशी युती करुन एका जागेवर निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :