Ind vs Eng 5th Test Day 3 : भारताचा इंग्लंडवर मोठा विजय | पुढारी

Ind vs Eng 5th Test Day 3 : भारताचा इंग्लंडवर मोठा विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर आटोपला असून भारताला २५९ धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताने आठ विकेट्सवर ४७३ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या (३०) रूपाने बसला. जेम्स अँडरसनने कुलदीपला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. त्याचवेळी शोएब बशीरने बुमराहला (२०) यष्टीचीत करून भारताचा डाव ४७७ धावांवर संपुष्टात आणला. आता भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरूवात केली आहे. (Ind vs Eng 5th Test Day 3)

इंग्लंडचा डाव आटोपला

सामन्यात जो रूटला बाद करून भारतीय संघाने ही कसोटी मालिका 4-1 अशा फराकाने जिंकली. जो रूटला भारताचा गोलंदाज कुलदीप यादवने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केले. रूटने आपल्या खेळीत 128 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार लगावले. रूटशिवाय एकाही इंग्लिश खेळाडूला मैदानावर फार काळ टिकता आले नाही.

इंग्‍लंडला नववा धक्‍का

४६ व्‍या षटकातील अखेरच्‍या चेंडूवर फिरकीपटू रवींद्र जडेजा याने शोएब बशीरला क्‍लीन बोल्‍ड केले. त्‍याने २९ चेंडूत १३ धावा केल्‍या. त्‍याने ज्‍यो रुटच्‍या जोडीने 9 व्‍या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करत इंग्‍लंडचा धावफलक हालता ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला.

जो रूटचे अर्धशतक

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजी पुढे इंग्लंडचे गोलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकले नाही. परंतु एका बाजून फलंदाज बाद होत असताना जो रूटने संयमी फलंदाजी करत 90 बॉलमध्ये आपले अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने 6 चौकार लगावले.

भारत विजयापासून दोन पावले दूर

141 धावांवर इंग्लंडला दोन धक्के बसले. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 35 व्या षटकात टॉम हार्टली (20) आणि त्यानंतर मार्क वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सध्या जो रूट आणि शोएब बशीर क्रीजवर आहेत. टीम इंडिया डावाने विजयाकडे वाटचाल करत आहे. त्याला फक्त दोन विकेट्सची गरज आहे.

इंग्लंडला सहावा धक्का; बेन फोक्स बाद

डावाच्या 27 व्या ओव्हरमध्ये बेन फोक्सच्या रूपात इंग्लंडला सहावा धक्का बसला. त्याला भारताचा फिरकीपटू अश्विनने बाद केले. बेन फोक्सने आपल्या खेळीत 17 बॉलमध्ये 8 धावा केल्या. यासह अश्विनने सामन्यात पाच विकेट घेतल्या.

लंचपर्यंत इंग्लंड 5 बाद 103

तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 103 धावा केल्या आहेत. इंग्लंड सामन्यात अजून 156 धावांनी मागे आहे. सध्या इंग्लिश संघाला डावाने पराभूत होण्याचा धोका आहे. लंचच्या आधीच्या बॉलवर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केले.

या विकेटसह अंपायरने लंच ब्रेक घोषित केला. स्टोक्सने आपल्या खेळीत दोन धावा केल्या. या संपूर्ण मालिकेत स्टोक्स बॅटने फ्लॉप ठरला आहे. अश्विनचे ​​या डावातील हे चौथे यश ठरले. यापूर्वी जॅक क्रोली (0), बेन डकेट (2) आणि ऑली पोप (19) बाद झाले आहेत. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला (39) कुलदीप यादवने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने रूटसोबत 56 धावांची भागीदारी केली. सध्या जो रूट 34 धावांवर नाबाद आहे.

भारत विजयापासून पाच पावले दूर; बेन स्टोक्स बाद

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या 23 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड करत इंग्लंडचा पाचवा फलंदाज बाद केला. स्टोक्सने आपल्या खेळीत 10 बॉलमध्ये 2 धावा केल्या.

अश्विन पाठोपाठ कुलदीपचा इंग्लंडला दणका; बेअरस्टो बाद

सामन्याच्या 18 व्या ओव्हरमध्ये कुलदीपने बेअरस्टोला बाद करत कुलदीपने इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्याने बेअरस्टोला एलबीडब्ल्यु केले. बेअरस्टोने आपल्या खेळीत 31 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याने जो रूटसोबत चौथ्या विकेटसाठी 50 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली.

बेअरस्टो-रूटची अर्धशतकी भागिदारी

फिरकीच्या सहय्याने अश्विनने तीन विकेट घेतल्यानंतर इंग्लंडच्या बेअरस्टो आणि रूट यांनी संयमी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला. यांनी चौथ्या विकेटसाठी 46 बॉलमध्ये 54 धावांची भागिदारी केली आहे.

अश्विनचा ट्रिपल धमाका; ओली पोप माघारी

इंग्लंडचा दुसऱ्या डावाच्या सुरूवातीपासून अश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर तीन विकेट घेतल्या. यामध्ये त्याने बेन डकेट, झॅक क्रॉली आणि ओली पोप यांना बाद केले. सामन्याच्या 10 व्या ओव्हरमध्ये ओली पोपला बादकरून अश्विनने इंग्लंडला तिसरा धक्का दिला, त्याने ओलीला जैस्वालकरवी झेलबाद केले. ओलीने आपल्या खेळीत 23 बॉलमध्ये 19 धावांची खेळी केली.

इंग्लंडला दुसरा झटका; झॅक क्रॉली बाद

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या ६ व्या ओव्हरमध्ये झॅक क्रॉलीला सर्फराजकरवी झेलबाद करत अश्विनने इंग्लंडला दुसरा झटका दिला. क्रॉलीने आपल्या खेळीत १६ बॉलमध्ये १ धाव करता आली.

इंग्लंडला पहिला झटका

डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का बसला. सलामीवीर बेन डकेटला बाद करत अश्विनने इंग्लंडला पहिला झटका दिला.

अँडरसन ७०० बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज

इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटीत ७०० बळी पूर्ण केले आहेत. धर्मशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी त्याने कुलदीप यादवला बाद करत ही खास कामगिरी केली. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला वेगवान आणि एकूण तिसरा गोलंदाज आहे. केवळ मुथय्या मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०८) यांनी त्याच्यापेक्षा जास्त कसोटी बळी घेतले आहेत.

भारताला नववा धक्का, कुलदीप आउट

भारताची धावसंख्या नऊ गड्यांच्या मोबदल्यात ४७७ धावा आहे. बुमराहसह कुलदीपने ४९ धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने डबल धमाका केला होता. भारताकडून शुक्रवारी दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकण्यात आली. कर्णधार रोहित शर्मान १०३ तर शुभमन गिलने ११० धावांची खेळी केली, त्यानंतर दोन युवा फलंदाजांनी अर्धशतके केली, सर्फराज खानने ५६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याला देवदत्त पडिक्कलने १०३ चेंडूत ६५ धावा करत चांगली साथ दिली. (Ind vs Eng 5th Test Day 3)

धावफलक : 

इंग्लंड प. डाव : ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा.

भारत प. डाव : यशस्वी जैस्वाल यष्टिचित फोक्स गो. बशीर ५७, रोहित शर्मा त्रि. गो. बेन स्टोक्स १०३, शुभमन गिल त्रि. गो. अँडरसन ११०, देवदत्त पडिक्कल त्रि. गो. शोएब बशीर ६५, सर्फराज खान झे. रूट गो. शोएब बशीर ५६, रवींद्र जडेजा पायचित गो. हार्टली १५, ध्रुव ज्युरेल झे. डकेट गो. बशीर १५, आर. अश्विन त्रि. गो. हार्टली ०.

गडी बाद क्रम : १/१०४, २/२७५, ३/२७९, ४/३७६, ५/४०३, ६/४२७, ७/४२७, ८/४२८.

गोलंदाजी : जेम्स अँडरसन १४-१-५९-१, मार्क वूड १५-१-८९-०, टॉम हार्टली ३९-३-१२६-२, शोएब बशीर ४४-५-१७०-४, बेन स्टोक्स ५-१-१७-१, जो रूट ३-०-८-०.

Back to top button