

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारतासमोर 192 धावांचे आव्हान आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वाबाद 353 धावा केल्या. तर या आव्हानचा पाठलाग करताना भारतीय संघाने सर्वबाद 307 धावा केल्या. यामुळे दुसऱ्या डावाची सुरूवात करताना इंग्लंडकडे 46 धावांची आघाडी होती. तर दुसऱ्या डावाच्या फलंदाजीमध्ये 145 धावा करत इंग्लंडचा डाव संपला. यामुळे भारतीय संघाला मालिकेत विजय मिळव्यासाठी 192 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने बिनबाद 40 धावा केल्या आहेत. तर, विजयासाठी आणखी 152 धावांचे आव्हान आहे. यामध्ये कर्णधार रोहितने 27 चेंडूत 24 धावा तर यशस्वीने 21 चेंडूत 16 धावांची खेळी केली आहे.(IND vs ENG Test)
तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर संपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, भारताचा पहिला डाव आज 307 धावांवर संपला. दुसऱ्या डावाच्या फलंदाजीमध्ये इंग्लिश संघाकडे 46 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात इंग्लिश संघाने 191 धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर १९२ धावांचे लक्ष्य आहे. जर टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी मिळवेल. पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी आणि तिसरी कसोटी भारताने जिंकली. रविचंद्रन अश्विनने पाच विकेट घेतल्या. कसोटीतील त्याची ही 35 वेळा त्याने पाच बळी घेण्याची किमया केली.
इंग्लंडने दिलेल्या 353 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. यामुळे इंग्लंडकडे दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी आहे. भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 90 धावा केल्या. त्याला टॉम हार्टलेने क्लीन बोल्ड केले. त्याच्या या खेळीला मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी आणि ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित भारतीय खेळाडूंनी ज्युरेलला स्टँडिंग ओव्हेशन दिले. (IND vs ENG 4th Test Day 3)
आज भारताने सात विकेट्सवर 219 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 88 धावा करताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या रूपाने बसला. कुलदीप २८ धावा करून बाद झाला. त्याने जुरेलसोबत ७६ धावांची भागीदारी केली. यानंतर आकाश दीप फलंदाजीला आला आणि त्याने जुरेलसोबत 40 धावांची भागीदारी केली. नऊ धावा करून आकाश बाद झाला. शोएब बशीरने या दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच बळी मिळवण्याची किमया साधली. जुरेल शेवटची विकेट म्हणून बाद झाला.
कर्णधार रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ 17 धावा करू शकला. रवींद्र जडेजा 12 धावा करून बाद झाला. रोहितला अँडरसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर शुभमन, रजत आणि जडेजा यांना शोएब बशीरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दरम्यान, यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. मात्र, 73 धावा करून तो बशीरचा बळी ठरला. सरफराज 14 धावा करून आऊट झाला तर अश्विन 1 धावा करून बाद झाला. या दोघांना हार्टलेने बाद केले. इंग्लंडकडून बशीरने पाच आणि हार्टलेने तीन बळी घेतले. तर जेम्स अँडरसनला दोन विकेट मिळाल्या.