Joe Root Centuries : जो रूटचे विक्रमी 31 वे शतक! विराट कोहलीला टाकले मागे

Joe Root Centuries : जो रूटचे विक्रमी 31 वे शतक! विराट कोहलीला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Joe Root Centuries : इंग्लिश फलंदाज जो रूटने रांची कसोटीच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकावून इतिहास रचला. यजमान भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये जो रूटला धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मात्र चौथ्या कसोटीत त्याने बॅझबॉल स्टाईलला तिलांजली देत आपला नैसर्गिक खेळ केला. या सावध खेळीतून त्याने भारताविरुद्ध शतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक ठरले आहे. अशाप्रकारे रूटने विराट कोहलीला फॅब-4 मध्ये खूप मागे टाकले आहे. केन विल्यमसनच्या नावावर फॅब-4 मध्ये सर्वाधिक शतके आहेत. स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या तर जो रूट तिसऱ्या स्थानावर आहे. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

रूटने रांची कसोटीत 219 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. 14 डावांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्याला कसोटीत शतक झळकावण्यात यश आले. त्याने यापूर्वी गेल्या वर्षी जूनमध्ये बर्मिंगहॅममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी साकारली होती. रुटने भारतीय भूमीवर 3 वर्षांनंतर कसोटीत शतक झळकावले. यापूर्वी त्याने फेब्रुवारी 2021 मध्ये चेन्नई कसोटीत द्विशतक झळकावले होते. (Joe Root Centuries)

रूटने भारताविरुद्ध 31वे कसोटी शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक 10 कसोटी शतके झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. (Joe Root Centuries)

फॅब 4 मधील सर्वाधिक कसोटी शतके

केन विल्यमसन : 32* (98 सामने)
स्टीव्ह स्मिथ : 32 (सामने 107)
जो रूट : 31 (सामने 139)
विराट कोहली : 29 (सामने 113)

भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके

जो रूट : 10
स्टीव्ह स्मिथ : 9
रिकी पाँटिंग : 8
व्हिव्हियन रिचर्ड्स : 8
गॅरी सोबर्स : 8
शिवनारायण चंद्रपॉल : 7

कसोटीत सर्वाधिक शतके करणारे इंग्लिश फलंदाज

ॲलिस्टर कुक : 33
जो रूट : 31
केविन पीटरसन : 23
वॉल्टर हॅमंड : 22
मायकेल काउड्रे : 22

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके

विराट कोहली : 80
डेव्हिड वॉर्नर : 49
जो रूट : 47
रोहित शर्मा : 47
केन विल्यमसन : 45

logo
Pudhari News
pudhari.news