पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Schedule Announcement : : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (22 फेब्रुवारी) जाहीर झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI) याची घोषणा केली. वेळापत्रकानुसार स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना एम एस धोनीच्या सीएसके आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सीएसकेचे होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) 22 मार्चला खेळवला जाणार आहे.
1. 22 मार्च – CSK विरुद्ध RCB (चेन्नई)
2. 23 मार्च – PBKS विरुद्ध DC (मोहाली)
3. 23 मार्च – KKR विरुद्ध SRH कोलकाता
4. 24 मार्च – RR विरुद्ध LSG (जयपूर)
5. 24 मार्च – GT विरुद्ध MI (अहमदाबाद)
6. 25 मार्च – RCB विरुद्ध PBKS (बेंगळुरू)
7. 26 मार्च – CSK विरुद्ध GT (चेन्नई)
8. 27 मार्च – SRH विरुद्ध MI (हैदराबाद)
9. 28 मार्च – RR विरुद्ध DC (जयपूर)
10. 29 मार्च – RCB विरुद्ध KKR (बेंगळुरू)
11. 30 मार्च – LSG विरुद्ध PBKS (लखनौ)
12. 31 मार्च – GT विरुद्ध SRH (अहमदाबाद)
13. 31 मार्च – DC विरुद्ध CSK (विशाखापट्टणम)
14. 1 एप्रिल – MI विरुद्ध RR (मुंबई)
15. 2 एप्रिल – RCB विरुद्ध LSG (बेंगळुरू)
16. 3 एप्रिल – DC विरुद्ध KKR (विशाखापट्टणम)
17. 4 एप्रिल GT विरुद्ध PBKS (अहमदाबाद)
18. 5 एप्रिल SRH विरुद्ध CSK (हैदराबाद)
19. 6 एप्रिल RR विरुद्ध RCB (जयपूर)
20. 7 एप्रिल MI विरुद्ध DC (मुंबई)
21. 7 एप्रिल LSG विरुद्ध GT (लखनौ)
महान क्रिकेटपटू एम एस धोनीची आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी स्पर्धेतील सर्वकालीन उत्कृष्ट प्लेईंग इलेव्हनचा लीडर म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम, मॅथ्यू हेडन, टॉम मूडी आणि डेल स्टेन यांचा समावेश असलेल्या एलिट निवड समितीने धोनीची गोट इलेव्हन कॅप्टन म्हणून निवड केली. किमान 70 पत्रकारही निवड प्रक्रियेचा भाग होते.
एमएस धोनी (कर्णधार), विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, किरॉन पोलार्ड, रशीद खान, सुनील नरेन, युझवेंद्र चहल, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.