U-19 WC : भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी 254 धावांचे आव्हान | पुढारी

U-19 WC : भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी 254 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारत विरुद्ध 50 षटकात 253 धावा केल्या आहेत. भारताला विजेतेपदासाठी 254 धावांचे लक्ष्य आहे ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक ५५ धावांची खेळी खेळली. तर कर्णधार वेबगेनने 48 धावा केल्या. सलामीला आलेला हॅरी डिक्सनही 42 धावा करून बाद झाला. याशिवाय ऑलिव्हर पीक 46 धावांवर तर टॉम स्ट्रेकर 8 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर नमन तिवारीने 2 बळी घेतले. याशिवाय सौम्या पांडे आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले. ( U-19 WC )

Back to top button