Rishabh Pant IPL 2024 : ‘ऋषभ पंत IPL खेळणार पण…’, रिकी पाँटिंग यांचे मोठे विधान

Rishabh Pant IPL 2024 : ‘ऋषभ पंत IPL खेळणार पण…’, रिकी पाँटिंग यांचे मोठे विधान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishabh Pant IPL 2024 : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) टीम दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत यंदाचा संपूर्ण आयपीएल हंगाम खेळेल असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केला आहे.

पाँटिंग काय म्हणाले?

पाँटिंग म्हणाले, 'डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंत मैदानात परतण्याची वाट पाहत आहे. त्याला पूर्ण विश्वास आहे की तो संपूर्ण हंगाम खेळण्यासाठी उपलब्ध असेल. पंत कसून सराव करत आहे. त्याचबरोबर आपल्या फिटनेवरदेखील काम करतोय. तुम्ही त्याची प्रगती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली असेल. आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी 6 आठवडे बाकी आहेत. पण यंदाच्या हंगामात ऋषभला यष्टीरक्ष म्हणून भूमिका बजावता येण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, मी हमी देतो की जर त्याला विकेटच्या मागे जबाबदारी घेण्याबाबत विचारले तर तो नकारही देणार नाही.'

'पंत 10 सामने खेळल्यास संघाला फायदा होईल' (Rishabh Pant IPL 2024)

'पंत हा शानदार खेळाडू आहे. तो आमचा कर्णधार आहे आणि गेल्या वर्षी आम्हाला त्याची उणीव नक्कीच भासली. अपघातानंतर तो 12-13 महिने क्रिकेटपासून दूर आहे. मी असे म्हणेन की अशा अपघातातून वाचणे हा एक चमत्कार आहे, तो आता क्रिकेट खेळण्यासाठी देखील तयार आहे. एका भीषण अपघाताला बळी पडूनही तो ज्याप्रकारे पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे ते फार कौतुकास्पद आहे,' अशी भावना पाँटिंग यांनी बोलून दाखवली.

'..तर वॉर्नर दिल्लीचा कर्णधार'

'आम्हाला आशा आहे की पंत लवकरच तंदुरुस्त होईल. जरी तो संपूर्ण आयपीएल खेळू शकत नसला तरी तो 14 पैकी 10 सामने नक्कीच खेळेल. जर तो क्षेत्ररक्षण करू शकत नसेल तर तो इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजी करेल. जर पंत कर्णधार होऊ शकला नाही तर डेव्हिड वॉर्नर संघाची नेतृत्व करेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या मोसमात वॉर्नरने दिल्लीचे कर्णधारपद भूषवले होते, पण 14 सामन्यांत केवळ 5 विजय मिळवून संघ 9व्या स्थानावर राहिला.

2022 च्या अखेरीस झाला होता अपघात (Rishabh Pant IPL 2024)

30 डिसेंबर 2022 रोजी पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. तो IPL 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, वनडे वर्ल्डकपसह अनेक मालिकांमधून तो बाहेर पडला.

पंतची आयपीएलमधील कामगिरी कशी आहे?

पंतने 2016 च्या हंगामापासून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून, त्याने 98 सामन्यांमध्ये 34.61 च्या सरासरीने आणि 147.97 च्या स्ट्राइक रेटने 2,838 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने 15 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. पंतने अनुक्रमे 2021 आणि 2022 मध्ये दिल्ली कॅपीटल (डीसी) संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली डीसीने 30 पैकी 16 जिंकले आहेत आणि 13 गमावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news