IPL 2024 : आयपीएलची स्पॉन्सरशीप पुन्हा टाटा समूहाकडे; मोजले ‘इतके’ कोटी

IPL 2024 : आयपीएलची स्पॉन्सरशीप पुन्हा टाटा समूहाकडे; मोजले ‘इतके’ कोटी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा समूहाने पुढील पाच वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे प्रायोजकत्व कायम राखले आहे. टाटा समूहाने पुन्हा आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले आहेत. या कराराअंतर्गत, टाटा पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे 2028 पर्यंत या प्रतिष्ठित T20 स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक राहतील. (IPL 2024)

बीसीसीआयने आज २० जानेवारी रोजी जाहीर केले की टाटा समूहाने आयपीएलचे शीर्षक प्रायोजकत्व आणखी पाच वर्षांसाठी २०२४ ते २०२८ पर्यंत वाढवले ​​आहे. त्यासाठी टाटा समूहाने २,५०० कोटी रुपये मोजले आहेत. ही लीगच्या इतिहासातील सर्वात जास्त प्रायोजकत्वाची रक्कम आहे. टाटा समूह २०२२ आणि २०२३ मध्ये IPL शीर्षक प्रायोजक होता आणि महिला प्रीमियर लीग (WPL) चे शीर्षक प्रायोजकदेखील आहे.

आयपीएलचे प्रायोजकता मिवण्याच्या शर्यतीमध्ये टाटा समूहासह आदित्य बिर्ला समुह होता. यामध्ये टाटाने ग्रुपने राईट टू मॅच (RTM) आधारे करार अंतिम केला. याचा अर्थ असा की टाटा समूहाने राईट टू मॅच कार्ड वापरले आणि आदित्य बिर्ला समुहाने हक्क जिंकण्यासाठी बोली लावलेली रक्कम (रु. २,५०० कोटी) देण्याचे मान्य केले. भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समुहांपैकी एक असलेल्या टाटा समुहाने यापूर्वी २०२२ ते २०२३ या दोन वर्षांसाठी आयपीएलशी करार केला होता. (IPL 2024)

टाटा समूहाने २०२२ मध्ये हे हक्क Vivo कडून बोलीद्वारे जिंकले होते. दरम्यान, ड्रीम ११ ला एका हंगामासाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे हक्कही मिळाले आहेत. यापूर्वी २००८ मध्ये याला पेप्सी आयपीएल असेही म्हटले जात होते. पण आता पुढची पाच वर्षे आयपीएलशी टाटा ग्रुपचे नाव जोडले गेले आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये विवोने पाच वर्षांसाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळवले होते. यामध्ये २,१९९ कोटी रुपयांचा करार झाला होता. पण एका वर्षातच हा करार कोरोनामुळे थांबला. कोविडच्या काळात ड्रीम ११ ने आयपीएलच्या एका हंगामासाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवली होती.

त्यानंतर २०२२ मध्ये, जेव्हा भारत आणि चीनमधील वाद वाढला तेव्हा टाटा समूहाने यात उडी घेतली आणि Vivoला ३६५ कोटी रुपये प्रति हंगाम रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर टाटांना आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळाले होते.

टाटा समूह २०२२ पासून आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. २०२२ आणि २०२३ सीझनसाठी टाटांनी बीसीसीआयला ३६५ कोटी प्रति सीझन असे ७३० कोटी दिले होते. याआधी आयपीएलचा प्रायोजक विवो होता. या स्मार्टफोन कंपनीने २०२२ मध्ये टायटल स्पॉन्सरशीप डीलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news