T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे. या स्पर्धेसाठी सर्व 20 संघ पात्र ठरले आहेत आणि शुक्रवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होईल. भारत-पाकिस्तान यांच्यात 9 जून 2024 रोजी न्यूयॉर्क येथे हाय व्होल्टेज सामना होणार आहे.

आतापर्यंत उभय संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये 7 वेळा भिडले आणि त्यात पाकिस्तानने 1 विजय मिळवला आहे. 2022 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने ही पराभवाची मालिका खंडित केली होती. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये 55 सामने होणार आहेत.

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या महत्त्वाच्या तारखा :

सलामीचा सामना :

1 जून – अमेरिका विरुद्ध कॅनडा
साखळी फेरीचे सामने : 1 ते 18 जून
सुपर 8 फेरीचे सामने : 19 ते 24 जून
पहिली सेमी फायनल : 26 जून, गयाना
दुसरी सेमी फायनल : 27 जून, त्रिनिदाद
फायनल : 29 जून, बार्बाडोस

पात्र ठरलेले 20 संघ :

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँडस्, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा

गटवारी :

अ – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क – न्यूझीलंड, विंडीज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँडस्, नेपाळ

भारतीय संघाचे वेळापत्रक : (T20 World Cup 2024)

5 जून 2024 : वि. आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून 2024 : वि. पाकिस्तान. न्यूयॉर्क
12 जून 2024 : वि. अमेरिका, न्यूयॉर्क
15 जून 2024 : वि. कॅनडा, फ्लोरिडा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news