Lionel Messi Jersey : अर्जेंटिनाकडून मेस्सीचा सन्मान; १० नंबर जर्सी केली निवृत्त | पुढारी

Lionel Messi Jersey : अर्जेंटिनाकडून मेस्सीचा सन्मान; १० नंबर जर्सी केली निवृत्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वातून अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अर्जेंटिना फुटबॉल संघाने त्याची जर्सी क्रमांक 10 निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार लिओनेल मेस्सीने 2022 साली झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेटिंनाला जेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या सन्मानाकरिता अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने राष्ट्रीय संघातील 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (Lionel Messi Jersey)

स्पॅनिश डेलीमधील वृत्तानुसार, अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडिओ तापिया यांनी सांगितले की, मेस्सी राष्ट्रीय संघातून निवृत्त झाल्यावर आम्ही कोणत्याही खेळाडूला 10 क्रमांकाची जर्सी परिधान करण्याची परवानगी देणार नाही. मेस्सीच्या निवृत्तीनंतर 10 क्रमांकाची जर्सीही निवृत्त होणार आहे.”आम्ही त्याच्या सन्मानाकरिता करत आहोत. (Lionel Messi Jersey)

२०२२ साली पटकावले फिफा वर्ल्डकप

18 डिसेंबर 2023 या दिवशी फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करत मेस्सीने अर्जेंटिनाला विश्वविजेते बनवले होते. त्याच्या कारकिर्दीत त्याने पहिल्यांदाच हा किताब जिंकला होता. त्यामुळे त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. 2014 साली झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाला जर्मनीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मेस्सीने परिधान केलेल्या जर्सींना मिळाले तब्बल 64 कोटी

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) सहा जर्सींचा लिलाव करण्यात आला. या जर्सी करोडो रुपयांना विकल्या गेल्या. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या लिलावात या सहा जर्सी 7.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 64.75 कोटी रुपयांना विकल्या गेल्या. या सर्व जर्सी मेस्सीने फिफा विश्वचषक 2022 दरम्यान परिधान केल्या होत्या. आपल्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवणाऱ्या मेस्सीने या सहा जर्सी गट फेरीतील सामन्यांमध्ये घातल्या होत्या.

हेही वाचा :

Back to top button