Virat Kohli Record : विराट कोहली बनला ‘WTC’तील नंबर 1 भारतीय फलंदाज, रोहित शर्माला टाकले मागे | पुढारी

Virat Kohli Record : विराट कोहली बनला ‘WTC’तील नंबर 1 भारतीय फलंदाज, रोहित शर्माला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीने हिटमॅनला मागे टाकले आहे. विराटने 34 धावांचा टप्पा पार तो डब्ल्यूटीसीमध्ये सर्धाधिक धावा करणारा नंबर 1 भारतीय फलंदाज बनला आहे.

विराट कोहली नंबर 1 भारतीय

रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 26 सामन्यांच्या 42 डावांमध्ये 2097 धावा आहेत. मात्र आता विराट कोहलीने सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात 38 धावा करत रोहितला मागे टाकले. WTC च्या 35 सामन्यांच्या 57 डावांमध्ये विराटच्या नावावर 2101 धावा जमा झाल्या आहेत. रोहितने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 7 शतके आणि 6 अर्धशतके फटकावली आहेत. तर विराटच्या नावावर 4 शतके आणि 9 अर्धशतके आहेत. विराटची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 254 आहे तर रोहितची सर्वोत्तम धावसंख्या 212 आहे.

WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

विराट कोहली : 2101 धावा
रोहित शर्मा : 2097 धावा
चेतेश्वर पुजारा : 1769 धावा
अजिंक्य रहाणे : 1589 धावा
ऋषभ पंत- 1575 धावा

2019 मध्ये सुरू झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा इंग्लंडचा फलंदाज जो रूटच्या नावावर आहेत. त्याने आतापर्यंत 47 कसोटीत 3,987 धावा केल्या आहेत. टॉप 10 फलंदाजांमध्ये भारताचा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज होता. मात्र आता विराट कोहलीने त्याला मागे टाकत दहावे स्थाना पटकावले आहे. रोहित शर्मा आता 11व्या स्थानावर पोहोचला आहे.

सुपरस्पोर्ट पार्कमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा पाहुणा फलंदाज

कोहलीने सुपरस्पोर्ट पार्कवर फलंदाजी करताना 18 धावा करून एक पराक्रम केला. तो या मैदानावर सर्वाधिक धावा (264*) करणारा पाहुणा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराला मागे टाकले आहे. संगकाराने या मैदानावर 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावात 228 धावा केल्या आहेत.

Back to top button