Bajrang Punia : ‘’मी ‘पद्मश्री’ परत करतोय…’’ PM मोदींना पत्र लिहून बजरंग पुनियाची पुरस्कार वापसी

Bajrang Punia : ‘’मी ‘पद्मश्री’ परत करतोय…’’ PM मोदींना पत्र लिहून बजरंग पुनियाची पुरस्कार वापसी
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भारताच्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप करत केलेल्या आंदोलनाला बजरंग पुनियाने शेवटपर्यंत पाठिंबा दर्शवला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या बजरंग पुनियाने (Bajrang Punia) PM नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करीत असल्याची घोषणा केली.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (21 डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण 47 जणांनी या निवडणुकीत मतदान केले. यापैकी 40 मते संजय सिंह यांच्या पारड्यात पडली, तर अनिता यांना केवळ सात मते मिळाली.

संजय सिंह अध्यक्ष होताच बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली आहे. या तिघांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने एक मोठा निर्णय घेतला आहे. मी माझा पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्र्यांना परत करत आहे, असे कॅप्शन लिहीत बजरंगने एक पत्र एक्स या साईटवर पोस्ट केले आहे.

तीन पानांच्या या भल्यामोठ्या पत्रात बजरंगने आंदोलनाचा घटनाक्रम, सरकारमधील मंत्र्यांची आश्वासने, गृहमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर झालेली कुस्ती संघटनेची निवडणूक या सर्वांचा उल्लेख केला आहे. याचबरोबर बृजभूषण यांच्या 'दबदबा हैं, दबदबा रहेगा' या वक्तव्याचादेखील उल्लेख करत बजरंगने सरकारने दिलेले पुरस्कार कसे बोचत आहेत, हे सांगितले.

2019 साली मिळाला होता 'पद्मश्री'

बजरंग पुनियाला (Bajrang Punia) 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. याच वर्षी बजरंग पुनियाला 'खेलरत्न' पुरस्कारदेखील मिळाला होता.

पत्रास कारण की…

कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या पत्रात लिहिले, आशा आहे की, तुमची प्रकृती चांगली असेल. तुम्ही देशाच्या सेवेमध्ये व्यस्त असणार. तुमच्या व्यस्ततेदरम्यान मी आपले लक्ष कुस्तीकडे वळवू इच्छितो. आपल्याला माहीतच आहे की, यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले, तेव्हा मीही त्यात सहभागी झालो होतो. सरकारने आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर जानेवारी महिन्यातच कुस्तीपटू आपापल्या घरी निघून गेले. मात्र, तीन महिन्यांनंतरही बृजभूषण सिंह यांच्यावर 'एफआयआर'ही दाखल झाला नव्हता. आता निवडणुकीतून पुन्हा त्यांचीच सत्ता कुस्ती संघटनेवर आली आहे. त्यानंतर त्यांनी 'दबदबा हैं, दबदबा रहेगा' अशा स्वरूपाची वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या महिलांचा हा अपमान आहे. अशा परिस्थितीत मी पद्मश्री पुरस्कार विजेता ही उपाधी मला बोचते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news