IND vs SA : भारत-द. आफ्रिका यांच्यात निर्णायक सामना आज | पुढारी

IND vs SA : भारत-द. आफ्रिका यांच्यात निर्णायक सामना आज

पार्ल; वृत्तसंस्था :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज बोलँड पार्कवर होणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने, तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकल्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. (IND vs SA)

त्यामुळे या सामन्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर फक्त एकदाच मालिका विजय मिळवला आहे. याची पुनरावृत्ती करायची असेल, तर भारताचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याने चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. सलामी जोडीने पहिल्या सामन्यात 23, तर दुसर्‍या सामन्यात 4 धावांची भागीदारी केली आहे. (IND vs SA)

पार्लचे बोलँड पार्क मैदान फलंदाजीला अनुकूल मानले जाते. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ वरचढ ठरतो, असा मैदानाचा इतिहास आहे. गेल्या वर्षी जानेवारीत झालेल्या दोन वन-डे सामन्यांत भारत पराभूत झाला होता. त्याचा वचपा काढून मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे.
सामन्याच्या दिवशी येथील हवामान स्वच्छ आणि सूर्यप्रकाशयुक्त राहील. येथे पावसाची अजिबात शक्यता नाही. कमाल तापमान 36 डिग्री सेल्सियस, तर किमान 16 डिग्री सेल्सियस राहील. सामना डेनाईट स्वरूपात असल्याने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होईल.

हेही वाचा :

Back to top button