IPL 2024 Auction : डॅरिल मिशेलला लागली लॉटरी! CSK ने मोजले 14 कोटी | पुढारी

IPL 2024 Auction : डॅरिल मिशेलला लागली लॉटरी! CSK ने मोजले 14 कोटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये लिलाव सुरू आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने ट्रॅव्हिस हेडला 6.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे. तर हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघाने रोव्हमन पॉवेलचा आपल्या शिबिरात समावेश केला आहे. त्याचबरोबर भारताचे स्टार फलंदाज करुण नायर आणि मनीष पांडे यांना कोणीही खरेदीदार मिळालेला नाही.

ख्रिस वोक्सला पंजाब किंग्जने घेतले विकत

ख्रिस वोक्सला पंजाब किंग्ज संघाने 4.2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. वोक्सची गणना सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते.

न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला मिळाली मोठी रक्कम

न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज डेरिल मिशेलने लिलावासाठी त्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये ठेवली होती. त्याला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये बोलीचे युद्ध झाले. पण CSK ने या बोलीमध्ये अचानक एन्ट्री घेतली आणि त्याला 14 कोटींना विकत घेतले.

जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सने घेतले विकत

जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्स संघाने 5 कोटींना विकत घेतले आहे. जेराल्डने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार गोलंदाजी केली आणि 20 बळी घेतले.

Back to top button