

मेलबर्न, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाने (AUS vs PAK ) मेलबर्न येथे पाकिस्तानविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटीसाठी आपला 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पर्थमध्ये 360 धावांनी एकतर्फी विजय मिळवणार्या मागील संघात ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने फारसा बदल केलेला नाही. यावेळी 14 खेळाडूंचा संघ घोषित करण्याऐवजी ऑस्ट्रेलियाने 13 खेळाडूंचा संघ निवडला आहे. अनकॅप्ड वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसला देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यासाठी करण्यासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
साहजिकच, दुसर्या कसोटीतही मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स हे अनुभवी त्रिकूट वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर स्कॉट बोलँडच्या रूपाने संघाकडे आणखी एक पर्याय त्यांच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने प्लेइंग-11 मध्ये बदल केल्यास स्टार्कला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी बोलंडचा संघात समावेश केला जाऊ शकते.
पहिल्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियासमोर एकमेव चिंतेचा विषय स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन हा होता. 26 डिसेंबर रोजी होणार्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी तो वेळेत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. (AUS vs PAK)
दुसर्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, जोश हॅझलवूड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिच स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.