RSA vs IND : अर्शदीप-आवेशचा द. आफ्रिकेला ‘दे धक्का’, केवळ ३२ धावांत पटकावल्या ७ विकेट्स | पुढारी

RSA vs IND : अर्शदीप-आवेशचा द. आफ्रिकेला 'दे धक्का', केवळ ३२ धावांत पटकावल्या ७ विकेट्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला पहिला सामना आज (दि. 17) जाेहान्‍सबर्ग येथे सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्‍या वेगवान गाेलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान या जोडगोळीने केवळ ३२ धावा देत ७ विकेट्स पटाकवल्या आहेत. आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना भोपळाही फोडता आलेला नाही. अर्शदीपने ४ तर आवेश खानने ३ विकेट्स पटकावल्या आहेत.

दोघांनाही होती हॅटट्रीकची संधी

अर्शदीप आणि आवेश दोघांनीही आफ्रिकेला सलग दोन धक्के दिले. मात्र, त्यांना हॅटट्रीकमध्ये रुपांतर करता आले नाही. आफ्रिकेकडून रिझा हेंड्रक्स, रॅसी वँडर ड्युसेन आणि विल्यम मल्डर यांना भोपळाही फोडता आला नाही. रिझा हेंड्रक्स आणि रॅसी वँडर ड्युसेनला अर्शदीप सिंगने तंबूत धाडले. तर विल्यम मल्डरला आवेश खानने बाद केले आहे. 

केएल राहुलच्या नेतृत्वात वनडे मालिका खेळणार भारत

लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारत तीन सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला लोकेश राहुलने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्याने सांगितले की, संजू सॅमसन वन डेमध्ये मधल्या फळीत अर्थात पाच किंवा सहा नंबरला खेळेल. रिंकू सिंगला आगामी मालिकेत संधी दिली जाईल. मी स्वत: एक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून प्रतिनिधित्व करेन. चौथ्या क्रमांकावर मला खेळण्यास संघ व्यवस्थापनाने हिरवा सिग्नल दिला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button