Rohit Sharma : ‘हार्दिक’ची कर्णधारपदी वर्णी, मुंबई इंडियन्सने शेअर केला ‘रोहित’चा इमोशनल व्हिडिओ
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 सीजनसाठी मुंबई इंडियन्सने अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, हार्दिकपूर्वी गेल्या अनेक वर्षांपासून रोहित शर्माकडे ही जबाबदारी होती. तो सर्वाधिक काळ मुंबईचा कर्णधार राहिला. रोहितने संघाला ५ वेळेस चॅम्पियन बनवलत आयपीएलमध्ये मोठे यश मिळवलय. आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी रोहित शर्मा एक आहे.
महेला जयवर्धने म्हणाले, "हा वारसा बांधण्याचा एक भाग आहे आणि भविष्यासाठी तयार होण्याच्या MI तत्त्वज्ञानाशी खरा राहणे आहे. सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकीपासून रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभले आहे. ज्यांनी तत्काळ यशात योगदान देत भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावर नेहमीच लक्ष ठेवले आहे. या तत्वज्ञानाला अनुसरून हार्दिक पांड्या आयपीएल 2024 च्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारेल."
माजी कर्णधार रोहितचा भावनिक व्हिडिओ
दरम्यान, रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याचा इमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर करून माजी कर्णधाराचे आभार मानले आहेत. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. MI च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.