IPL 2024 : हार्दिक पंड्या होणार मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार, रोहित शर्माकडे कोणती जबाबदारी? | पुढारी

IPL 2024 : हार्दिक पंड्या होणार मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार, रोहित शर्माकडे कोणती जबाबदारी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामापूर्वी शुक्रवारी (दि.१५) हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. आयपीएलमध्ये पुढील काळासाठी नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने मुंबईने हा निर्णय घेतला आहे.  गुजरात टायटन्सकडून सनसनाटी ट्रेड मूव्हचा भाग म्हणून पंड्या मुंबईच्या संघात पुन्हा सामील झाला. पंड्या गेल्या दोन वर्षांपासून गुजरात टायटन्सचा कर्णधार होता आणि त्याने गुजरातला चॅम्पियन बनवले होते. (IPL 2024)

कर्णधार असताना रोहितने फ्रँचायझीला पाच आयपीएल ट्रॉफी मिळवून दिल्या. रोहित आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. हार्दिककडे कर्णधारीपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर रोहितकडे कोणती जबाबदारी असणार आहे? हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. मुंबई इंडियन्सकडून अद्याप रोहितबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  (IPL 2024)

याबाबत मुंबई इंडियन्सचे महेला जयवर्धने म्हणाले, “हा वारसा बांधण्याचा एक भाग आहे आणि भविष्यासाठी तयार होण्याच्या MI तत्त्वज्ञानाशी खरा राहणे आहे. सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकीपासून रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभले आहे. ज्यांनी तत्काळ यशात योगदान देत भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावर नेहमीच लक्ष ठेवले आहे. या तत्वज्ञानाला अनुसरून हार्दिक पांड्या आयपीएल 2024 च्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारेल.” (IPL 2024)

पंड्याने 2022-23 पासून गुजरात टायटन्ससाठी 31 सामन्यांमध्ये, 37.86 च्या सरासरीने आणि 133 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 833 धावा केल्या. ज्यामध्ये सहा अर्धशतके झळकावली आहेत. शिवाय त्‍याने संघासाठी 11 विकेटही घेतल्या. (IPL 2024)

हेही वाचलंत का?

Back to top button