सूर्यकुमारची शतकी खेळी, भारताचे द. आफ्रिकेसमोर 202 धावांचे आव्हान | पुढारी

सूर्यकुमारची शतकी खेळी, भारताचे द. आफ्रिकेसमोर 202 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 201 धावा केल्या असून आफ्रिकेसमोर 202धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताकडून, सूर्यकुमार यादव ५६ चेंडूमध्ये १००, यशस्वी जयस्वालने ४१ चेंडूमध्ये ६० धावा, शुभमन गिलने ६ चेंडूमध्ये १२ धावा आणि रिंकू सिंगने १० चेंडूमध्ये १४ धावांचे योगदान दिले. भारताने शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवच्या रुपाने सुरुवातीच्या विकेट गमावल्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालने भारताचा डाव सावरला.

सूर्या आणि यशस्वीच्या खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. आफ्रिकेकडून केशव महाराजने २ ,तरबेज शम्सीने १ आणि नांद्रे बर्गरने १  तर लिझार्ड विल्यम्सने २ विकेट पटकावल्या.   मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकलेला नव्हता. तर दुसऱ्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यात भारत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button