सांगली : आटपाडीत सुगंधी तंबाखूचा साठा करणाऱ्या दुकानदारावर छापा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सांगली : आटपाडीत सुगंधी तंबाखूचा साठा करणाऱ्या दुकानदारावर छापा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला आदी साहित्याची साठवणूक, विक्री करणाऱ्या आटपाडी शहरातील कलढोणे ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ३ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३७८ किलो तंबाखू व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. याबाबात अजय अंकुश कलढोणे (रा. आटपाडी), दिलीप म्हस्के (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी आटपाडीत छापा टाकला. कलढोणे ट्रेडर्स मधून अन्न औषध प्रशासन विभागाने पानमसाला (४८.७५ किलो), सुगंधित तंबाखू (३.६ किलो ग्रॅम), विमल पान मसाला (किंग प्याक) (१७.४ किलो) व्ही १ सुगंधित तंबाखू (किंग प्याक) (२.६ किलो), आरएमडी पानमसाला ( ४.४ किलो ग्रॅम), एम सुगंधित तंबाखू (३१५ ग्रॅम), राजू इलयची सुपारी ( ३३ किलो), रत्ना ३००० सुगंधित तंबाखू (३२ किलो), दिनाजी सुगंधित तंबाखू (८८किलो), प्रभात ३१० सुगंधित तंबाखू (७ किलो), राज कोल्हापुरी गुटखा (४.५ किलो), सुपर पान मसाला (२९.८ किलो), एसपी ९९९ सुगंधित तंबाखू ( ६.२ किलो), ३१० सुगंधित तंबाखू (३२.५ किलो), विनालेबल सुगंधित तंबाखू (१३ किलो), विनालेबलसुगंधित तंबाखू (२३.८ किलो), अंश ३००० सुगंधित तंबाखू (११.२ किलो).. अंश ३१० सुगंधित तंबाखू – (२१.२५० किलो) असे एकूण ३७८ किलो ३१५ ग्रॅम साहित्य साठा मिळून आला. मिळालेला साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार ३०५ रूपये आहे. सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी हवालदार, स्वामी यांनी ही कारवाई केली.

Back to top button