Virat Chicken Tikka post : विराट कोहलीच्या ‘चिकन टिक्का’ पोस्टवर चाहते क्लीन बोल्ड! | पुढारी

Virat Chicken Tikka post : विराट कोहलीच्या ‘चिकन टिक्का’ पोस्टवर चाहते क्लीन बोल्ड!

नवी दिल्ली : भारताचा फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ, तरुणाईचा आयकॉन विराट कोहली काही वर्षांपूर्वी शाकाहाराकडे वळला आहे, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र, याच विराटने बुधवारी चिकन टिक्काची एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर टाकली आणि नेटिझन्समध्ये क्षणभर गोंधळ निर्माण झाल्याशिवाय राहिला नाही! अर्थात, विराटने या पोस्टमध्ये आजही आपण शाकाहारीच असल्याचा निर्वाळा देताना ती डिश चिकन टिक्का नव्हे तर व्हेज डिश असल्याचे नमूद केले. (Virat Kohli’s Chicken Tikka post)

विराटने काही वर्षांपूर्वी युरिक अ‍ॅसिड रोखण्यासाठी शाकाहाराकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि हा बदल सुखावह असल्याने त्याने यापूर्वी वेळोवेळी म्हटले आहे. जागतिक स्तरावरील सर्वात तंदुरुस्त व तांत्रिकद़ृष्ट्या सर्वात सरस खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा आवर्जून समावेश होतो, हे येथे लक्षवेधी आहे. (Virat Kohli’s Chicken Tikka post)

Virat Chicken Tikka post : मॉक चिकन टिक्का म्हणजे नक्की काय?

‘मॉक चिकन टिक्का’मध्ये चिकन नसते. पण त्याची चव हुबेहुब चिकन टिक्क्यासारखी असते. मॉक चिकन टिक्का हे सोया प्रोटीन, गव्हाचे ग्लूटेन, टेक्सचर्ड व्हेजिटेबल प्रोटीन आणि मटार प्रोटीनपासून बनवले जाते. 2021 मध्येच कोहलीने एक पोस्ट शेअर करून स्वतःला शाकाहारी घोषित केले होते. कोहली नॉनव्हेज खात नाही. यामुळेच हा फोटो पाहून चाहते थक्क झाले होते. कोहलीने नॉनव्हेज खाण्यास सुरुवात केली आहे का असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.

Back to top button