क्रिकेटपटू ख्वाजाने बुटांवर असं काय लिहिलं?, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला खुलासा करणं भाग पडलं | पुढारी

क्रिकेटपटू ख्वाजाने बुटांवर असं काय लिहिलं?, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला खुलासा करणं भाग पडलं

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khwaja) याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सत्रादरम्यान असे काही बूट घातले होते की, यामुळे ऑस्‍ट्रेलियाच्‍या क्रिकेट संघासह साेशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी क्रिकेट ऑस्‍ट्रेलियाने खुलासा करत ख्वाजा याला समज दिली आहे. जाणून घेवूया या प्रकरणाविषयी… (Usman Khwaja Put ‘Palestine Struggle’ Slogan On His Shoes)

Usman Khwaja :  ख्वाजाच्‍या बुटांवर काय लिहलं होतं?

ख्वाजाच्या बुटांवर काही घोषणा लिहिण्यात आल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ख्वाजाच्या बुटांवर ‘स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे’ आणि ‘जीवन सर्वांसाठी समान आहे’ असे लिहिले होते. या शूज आणि त्यावर लिहिलेल्या संदेशासह पर्थमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळण्याची ख्वाजाची योजना होती, अशी चर्चा रंगली आहे. . ( Usman Khwaja Put ‘Palestine Struggle’ Slogan On His Shoes )

ऑस्‍ट्रेलियाने ख्वाजाला दिली समज

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा कडक ताकीद देत आयसीसीच्या नियमांची आठवण करून दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) या प्रकरणी ‘आयसीसीच्या नियमांचा’ हवाला दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे, “आम्ही आमच्या खेळाडूंच्या वैयक्तिक मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो; परंतु आयसीसीचे काही नियम आहेत जे वैयक्तिक संदेश प्रदर्शित करण्यास मनाई करतात. खेळाडूंनी या नियमांचे पालन करावे अशी आम्‍ही अपेक्षा करतो.’ (Usman Khwaja Put ‘Palestine Struggle’ Slogan On His Shoes)

Usman Khwaja : कर्णधार कॅप्टन कमिन्स काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याने कमिन्स म्हणाला, ‘त्याच्या शूजवर काही शब्द होते. मला वाटते की प्रत्येकाच्या स्वतःच्या वैयक्तिक विचार असतात. यासंदर्भात मी ख्वाजाशी चर्चा केली. मोठा गदारोळ माजवण्याचा त्याचा हेतू होता असे मला वाटत नाही, परंतु आम्ही त्याचे समर्थन करतो. ख्वाजाने पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी ते शूज घालण्याची कल्पना नाकारली आहे, असेही कमिन्‍सने स्‍पष्‍ट केले आहे.

‘आयसीसी’चा नियम काय सांगतो?

क्रिकेटपटूंच्‍या पेहरावाबद्‍दल आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेच्‍या (आयसीसी) नियम असा आहे की , “क्रिकेट सामन्‍यावेळी खेळाडूंनी युद्ध किंवा संबंधित विषयांशी संबंधित असलेले आणि शांततेच्या नियमांचे भंग करणारे कपडे किंवा उपकरणे वापरण्यास सक्त मनाई आहे. विशेषत: व्यावसायिक, धर्मादाय, इतर लोगो प्रदर्शित करण्याची खेळाडूला परवानगी नाही. या नियमाचा भंग करणार्‍या खेळाडूला खेळाच्या मैदानापासूनच रोखले जाईल.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button