U-19 World Cup : अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, उदय सहारन कर्णधार

U-19 World Cup : अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, उदय सहारन कर्णधार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : U19 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 विश्वचषक 2024 आणि दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. उदय सहारनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून सौम्य कुमार पांडेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

तिरंगी मालिकेसाठीही संघाची निवड

भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिका 29 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे, तर अंतिम सामना 10 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. संघात तीन खेळाडूंची स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली आहे.

बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाचा पहिला सामना (U19 World Cup 2024)

आयसीसीने अंडर 19 वर्ल्ड कपचे सोमवारी वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेचं यजमानपद हे दक्षिण आफ्रिकेकडे आहे. या स्पर्धेतील एकूण 16 संघांना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. त्यानुसार टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. या सामन्याचे आयोजन हे ब्लोमफोटेंनमध्ये करण्यात आले आहे.

ट्राय सीरीज आणि वर्ल्ड कपसाठी अंडर-19 टीम इंडिया

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय शरण (कर्णधार), अविनाश राव, सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिबानी, नमन तिवारी.

इतर 3 ग्रुपमध्ये कोणते संघ? (U19 World Cup 2024)

बी ग्रुप : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड.

सी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे आणि नामिबिया.

डी ग्रुप : अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ.

टीम इंडियाचे वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 जानेवारी.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 25 जानेवारी.

टीम इंडिया विरुद्ध यूएसए, 28 जानेवारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news