Ravi Bishnoi Top Bowler : रवी बिश्नोई ठरला टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज! राशिद खानला टाकले मागे | पुढारी

Ravi Bishnoi Top Bowler : रवी बिश्नोई ठरला टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज! राशिद खानला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravi Bishnoi Top Bowler : भारतीय फिरकीपटू रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज ठरला आहे. रवि बिश्नोईने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला मागे टाकलं आहे. नुकतीच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा किताब मिळाला. आता आयसीसीने (ICC) त्याला मोठे बक्षीस दिले आहे.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला बिश्नोईने (Ravi Bishnoi Top Bowler) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर या युवा फिरकीपटूने सातत्यपूर्ण कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी तो आयसीसी क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. आता तो थेट अव्वल स्थानी पोहचला आहे. 699 रेटिंगसह बिश्नोई पहिल्या, तर राशिद खान 692 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 679 गुणांसह तिसऱ्या, इंग्लंडचा आदिल राशीद 679 गुणांसह चौथ्या आणि महीश थीक्षाणा 677 गुणांसाह पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनेही 11 स्थानांची झेप घेत 16व्या स्थान मिळवले आहे. (Ravi Bishnoi Top Bowler)

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती. या विजयासह सूर्याच्या युवा सेनेने वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाचा हिशेब चुकता केला.

सूर्यकुमार यादव 855 रेटिंगसह टी-20 मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (787) आहे. या यादीत डेव्हिड मलान सहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर ऋतुराज गायकवाड एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने 16 स्थानांनी झेप घेत 19व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर शाकिब अल हसन टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

Back to top button