Suryakumar vs King Kohli : सूर्याच्या निशाण्यावर विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम! 60 धावा करताच… | पुढारी

Suryakumar vs King Kohli : सूर्याच्या निशाण्यावर विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम! 60 धावा करताच...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar vs King Kohli : टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या निशाण्यावर विराट कोहलीचा एक विक्रम आहे. जर सूर्याने आज (दि. 28) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 60 धावा केल्या तर तो या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान 2000 धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या हा विक्रम किंग कोहलीच्या नावावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसरा सामना जिंकून विजयी आघाडी मिळवणे हे टीम इंडियाचे लक्ष्य असेल.

सूर्यकुमार यादवने भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या 55 टी-20 सामन्यांच्या 52 डावांमध्ये 46.19 च्या सरासरीने आणि 173.52 च्या स्ट्राईक रेटने 1940 धावा केल्या आहेत. तो टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करण्यापासून फक्त 60 धावा दूर आहे. जर सूर्याने आज हा पल्ला गाठला तर तो या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल. जागतिक क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा तो तिसरा वेगवान खेळाडू ठरेल. आजच्या व्यतिरिक्त पुढील दोन सामन्यांमध्येही सूर्याला कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. (Suryakumar vs King Kohli)

विराट कोहली सध्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीत 2 हजार धावांपर्यंत मजल मारण्यासाठी 56 डाव घेतले. जागतिक क्रिकेटमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. बाबरने 52 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे, तर त्याचा देशबांधव मोहम्मद रिझवान (52 डाव) दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरने रिझवानपेक्षा कमी वेळेत 2000 धावा केल्या होत्या, त्यामुळेच तो या यादीत अव्वल आहे. (Suryakumar vs King Kohli)

Back to top button