Latest
IND vs AUS 2nd T20 : भारताचे ऑस्ट्रेलियाला 236 धावांचे आव्हान
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 235 धावा केल्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वालने 53, ऋतुराज गायकवाडने 58 आणि इशान किशनने 52 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल, परंतु रात्री फलंदाजी करणे सोपे होते आणि दव आल्यावर भारताला गोलंदाजीमध्ये अडचणी येऊ शकतात.
हेही वाचा :

