

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने भारताला 209 धावांचे लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत तीन गडी गमावून 208 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. स्मिथने 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर स्टिव्ह स्मिथ रन-आऊट बाद झाला. (IND vs AUS)
भारताविरूद्ध जोश इंग्लिशने आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 17व्या षटकात अर्शदीप सिंगच्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. यानंतर18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लिश 50 चेंडूत 110 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि आठ षटकार मारले.
स्टीव्ह स्मिथच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो धावबाद झाला. स्मिथने 41 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार मारले. स्मिथने जोश इंग्लिशसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली.
भारतविरूद्धच्या सामन्यात जोश इंग्लिशने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 12व्या षटकात रवी बिश्नोईच्या चेंडूवर षटकार मारून 50 धावांचा टप्पा पार केला.
पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोईने मॅथ्यू शॉर्टला क्लीन बोल्ड केले. 11 चेंडूत 13 धावा करून शॉर्ट बाद झाला.
संघ :
भारत प्लेइंग-11 : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा. (IND vs AUS)
ऑस्ट्रेलिया प्लेइंग-11 : मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिश, आरोन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.
हेही वाचा :