IND vs AUS Final : विराट ठरला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ | पुढारी

IND vs AUS Final : विराट ठरला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) कांगारू संघाने त्यांचा सहा गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला. (IND vs AUS Final )

विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारा कोहली हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी 2003 मध्ये सचिन तेंडुलकर आणि 2011 मध्ये युवराज सिंगने हा पुरस्कार जिंकला होता. यापैकी सचिन तेंडुलकर हा फायनलमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाचा सदस्य होता. (IND vs AUS Final )

स्पर्धेत विराट कोहलीने भारताच्या फलंदाजाचीमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने मधल्या षटकांमध्ये विकेट गमावल्या नाहीत. विराटने यंदाच्या स्पर्धेत 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यामध्ये त्याने तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली.

हेही वाचा :

Back to top button