WC Final India vs Australia live : हेडचे अर्धशतक | पुढारी

WC Final India vs Australia live : हेडचे अर्धशतक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  विश्‍वचषक क्रिकेटच्‍या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्‍याचा पाठलाग करतान दुसर्‍या षटकात ऑस्‍ट्रेलियाला पहिला धक्‍का बसला.मोहम्‍मद शमीने आपल्‍या पहिल्‍या षटकात डेव्‍हिड वॉर्नरला कोहली करवी झेलबाद केले. वॉर्नरने ३ चेंडूत सात धावा केल्‍या.

हेडचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो सामना भारताच्या पकडीतून बाहेर काढत आहे. टीम इंडियाला पुनरागमन करण्यासाठी विकेट्सची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने 23 षटकात 3 विकेट गमावत 122 धावा केल्या आहेत. हेड ५४ आणि मार्नस लॅबुशेन २५ धावांवर नाबाद आहेत.

हेड-लॅबुशेनने डाव सावरला

ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी मिळून ऑस्ट्रेलियन डावाची धुरा सांभाळली आहे. दोघेही सावधपणे खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, स्मिथ बाद

जसप्रीत बुमराहने भारताला तिसरे यश मिळवून दिले. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने स्टीव्ह स्मिथला बाद केले. नऊ चेंडूत चार धावा केल्यानंतर स्मिथ एलबीडब्ल्यू झाला.

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, मिचेल मार्श बाद

जसप्रीत बुमराहने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिचेल मार्शला बाद केले. मार्श 15 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला.

दुसऱ्याच षटकात वॉर्नर बाद झाला

मोहम्मद शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने डेव्हिड वॉर्नरला बाद केले. तीन चेंडूत सात धावा करून वॉर्नर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श क्रीजवर आहेत.

भारताचे ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ २४० धावांत ऑलआऊट झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली. (WC Final India vs Australia live)

भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले. आता संपूर्ण जबाबदारी गोलंदाजांवर आहे. त्याच्याकडून धोकादायक गोलंदाजीची अपेक्षा आहे. (WC Final India vs Australia live)

फिरकीपटूंना मदत करणारी खेळपट्टी

नरेंद्र मोदी स्टेडियमची विकेट फिरकी गोलंदाजीला मदत करण्यासाठी ओळखली जाते. आजच्‍या सामन्‍याच्‍या खेळपट्टीवर फिरकीपटूंना साथ मिळेल. प्रथम चेंडू स्‍विंग होईल. जसा खेळ चालेले तसे खेळपट्टी फिरकीपटूंना साथ मिळेल, असा अंदाज माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्‍त्री आणि हरभजन सिंग यांनी व्‍यक्‍त केला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने २८० ते ३०० धावा केल्‍यास या लक्ष्‍याचे पाठलाग करणे आव्‍हानात्‍मक असेल, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

Back to top button