ICC WC IND vs NED : ‘अर्धशतकांची माळ’ केएल राहूलचनेही झळकावली हाफ सेन्चुरी | पुढारी

ICC WC IND vs NED : 'अर्धशतकांची माळ' केएल राहूलचनेही झळकावली हाफ सेन्चुरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीच्या मुहूर्तावर आज विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध नेदरलँड यांच्यात सामना होत आहे. साखळी टप्प्यातील हा 45वा आणि शेवटचा सामना आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळूर येथे ही लढत रंगली असून टीम इंडियाने टॉस जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रेयस अय्यरचे शानदार शतक

सामन्याच्या 46 व्या षटकात श्रेयस अय्यरने आपले शतक पूर्ण केले. आपल्या खेळीमध्ये 84 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. यासह अय्यर-राहूल जोडीन चौथ्या विकेटसाठी 106 चेंडूत 146 धावांची भागिदारी केली.

‘अर्धशतकांची माळ’ केएल राहूलचनेही झळकावली हाफ सेन्चुरी

सामन्याच्या 43 व्या षटकात राहूलनेही आपले अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह भारतीय संघाने वन-डे वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या प्रथम पाच फलंदाजांनी अर्धशतके झळकवण्याची कामगिरी केली आहे. याआधी वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी कोणत्याही संघाने केली नव्हती. यामध्ये राहूलसह (88*)रोहित शर्मा(61), शुभमन गिल(51), विराट कोहली (51)  यांनी अर्धशतके झळकावली तर श्रेयर अय्यरने अर्धशतकाचे रूपांतर (110*) शतकामध्ये केले. श्रेयस अय्यरचे शानदार अर्धशतक

सामन्याच्या 34 व्या षटकात चौकार लगावत 48 चेंडूत श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार लगावले.

भारताला ‘विराट’ धक्का, कोहली अर्धशतक झळकावून बाद

विराटने सामन्यात 53 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताने 200 धावांचा टप्पा पार केला. परंतु, सामन्याच्या 29 व्या षटकात विराट कोहलीच्या रूपात भारताला मोठा झटका बसला. त्याला नेदरलॅन्डचा गोलंदाजव्हॅन डर मर्वेने क्लीन बोल्ड केले. विराटने आपल्या खेळीत 56 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

अर्धशतक झळकावून रोहित शर्मा बाद

सामन्याच्या 18 व्या षटकात कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताला दुसरा झटका बसला. त्याला नेदरलॅन्डचा गोलंदाज बास दे लीडने बरासी करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 54 चेंडू 61 धावांची खेळी केली. 8 चौकार आणि 2 षटकार लगावले.

रोहित शर्माचे शानदार अर्धशतक

रोहित शर्माने शानदार खेळी करत 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने विराटसोबत चांगली भागीदारी केली.

भारताला पहिला झटका, शुभमन गिल बाद

भारताची पहिली विकेट 100 धावांवर पडली. शुभमन गिल 32 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. एका मीकेरेनने त्याला निदामनुरुकडे झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले.

दोन्ही संघ :

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

नेदरलँडचा संघ : वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (डब्ल्यू/सी), बास डी लीडे, तेजा निदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

Back to top button