दुबई : पुढारी ऑनलाईन
अखेर ओस्ट्रेलियाने सामना जिंकला
29 दिवस आणि 45 सामन्यांनंतर T20 विश्वचषक 2021 चा चॅम्पियन सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच अँड कंपनीने 18.5 षटकांत 2 गडी गमावून न्यूझीलंडवर विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर (53) आणि मिचेल मार्श (77) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. 14 वर्षांच्या T20 विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया प्रथमच चॅम्पियन बनला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने अॅरॉन फिंचची (5) विकेट घेतली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शने 59 चेंडूत 92 धावा जोडून संघाला मजबूत स्थितीत आणले. ही भागीदारी बोल्टने वॉर्नरला (53) बाद करून तोडली. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 चेंडूत 66 धावा जोडून ऑस्ट्रेलिया संघाला चॅम्पियन बनवले.
T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. केन विल्यमसनने (85) सर्वाधिक धावा केल्या. (New Zealand vs Australia T20WC Final match)
15 व्या षटकात मॅक्सवेलने लागोपाठ दोन चौकार मारून मिल्नेविरुद्ध ११ धावा वसूल केल्या.
वॉर्नरची विकेट घेतल्यानंतर 14 व्या षटकात इश सोधीने तीन वाईड टाकले. न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर आला. षटकात तीन अतिरिक्त धावांसह एकूण 16 धावा मिळाल्या.
14 व्या षटकात मिचेल मार्शने इश सोधीच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले.
13व्या षटकात बोल्टने न्यूझीलंडला दुसरे यश मिळवून दिले. अर्धशतक झळकावणारा वॉर्नर बोल्टच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला.
13 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला. डेव्हिड वॉर्नर बाद झाला.
12 व्या षटकात ऑस्ट्रेलियावे अर्धशतक पूर्ण झाले
11 व्या षटक टाकायला जेम्स नीशम आला. मार्शने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून त्याचे स्वागत केले. वॉर्नरने षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.
11 व्या षटकात वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केले
10 षटकांनंतर ऑस्ट्रेलिया संघाने 1 गडी गमावून 82 धावा केल्या. विजयासाठी 60 चेंडूत 91 धावांची गरज आहे.
पहिली विकेट पडल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शने संघाची धुरा सांभाळली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी 1 गडी गमावून 43 धावा केल्या. या दोन फलंदाजांनी मिळून संघाची धावसंख्या 10 षटकांत 82 धावांपर्यंत नेली.
लक्ष्याचा पाठलाग करताना AUS ची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने अॅरॉन फिंचची (5) विकेट घेतली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम खेळणाऱ्या न्यूझीलंडने सुसाट सुरुवात केली. डॅरिल मिशेल आणि मार्टिन गप्टिल यांनी पहिल्या विकेटसाठी 23 चेंडूत 28 धावांची भागीदारी केली. जोश हेझलवूडने मिशेलची (11) विकेट घेत ही भागीदारी तोडली. पहिल्या विकेटनंतर किवींच्या डावाची गती मंदावली. 34 चेंडूनंतर संघाला पहिला चौकार मिळाळा. अॅडम झाम्पाने मार्टिन गप्टिलची (28) दुसरी विकेट घेतली. दोन गडी गमावल्यानंतर, केन विल्यमसन मैदानात उतरला. त्याने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकले. त्याने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 10 षटकापर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या 57/1 होती.
16 व्या षटकात विल्यमसनने स्टार्कच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार मारले आणि तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. केन एवढ्यावरच थांबला नाही आणि शेवटच्या दोन चेंडूंवरही चौकार मारले. किवी संघाच्या कर्णधाराने वेगवान धावा करत सामन्यात आणि संघाच्या संथ खेळीला जीवदान दिले. ग्लेन फिलिप्सला (18) बाद करून न्यूझीलंडची तिसरी विकेट हॅझलवूडने मिळवली. दोन चेंडूंनंतर त्याने विल्यमसनच्या (८५) खेळीला ब्रेक लावला.
पॉवरप्लेपर्यंत किवी संघाची धावसंख्या 1 गडी गमावून 32 धावा होती.
जोश हेजलवुडने सुपर-12 पासून आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यातील पॉवरप्लेमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत.
गप्टिलने 35 चेंडूत 28 धावांची संथ खेळी खेळली.
मिचेल स्टार्कने आपल्या तिसऱ्या षटकात 22 धावा दिल्या.
विल्यमसन (85) हे त्याचे T20I मधले 14 वे आणि या स्पर्धेतील पहिले अर्धशतक होते.
विल्यमसन (85) टी-20 डब्ल्यूसीच्या अंतिम सामन्यातील कोणत्याही कर्णधाराची ही सर्वात मोठी खेळी होती.