New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडचा पाकिस्तानसमोर ४०१ धावांचा डोंगर

New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडचा पाकिस्तानसमोर ४०१ धावांचा डोंगर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक २०२३ च्या ३५ व्या सामन्यात आज दि.  पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्‍यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन  आणि युवा फलंदाज रचिन रवींद्र यांनी पाकिस्‍तानचा हा निर्णय चुकीचा ठरवला. या दाेघांनी दुसर्‍या विकेटसाठी १८० धावांची निर्णायक भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर ४०१ धावांचा डोंगर उभारला आहे.

न्‍यूझीलंडला सलग दाेन धक्‍के

३५ व्‍या षटकामध्‍ये आपल्‍या दमदार खेळीने पाकिस्‍तानला जेरीस आणलेल्‍या न्‍यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन हा ९५ धावांवर बाद झाला. त्‍याला इफ्तिखार अहमदने फखर जमान करवी झेलबाद केले. यानंतर ३६ व्‍या षटकात न्‍यूझीलंडला तिसरा धक्‍का बसला शतकी खेळी रचिन रवींद्रही फटकेबाजीच्‍या नादात बाद झाला. मोहम्‍मद वसीने त्‍याला शकील करवी झेलबाद केले. त्‍याने ९४ चेंडूत १०८ धावा केल्‍या. ३७ षटकांपर्यंत न्‍यूझीलंडने ३ गडी गमावत २७१ धावा केल्‍या आहेत. मार्क चॅपमन आणि डॅरिल मिशल हे क्रीझवर आहेत.

न्‍यूझीलंडने ४० व्‍या षटकामध्‍ये तीन गडी गमावत ३०० धावांचा टप्‍पा ओलांडला. ४२ व्‍या षटकामध्‍ये न्‍यूझीलंडला चौथा झटका बसला. मिचेल याला हारिस रौफने त्रिफळाचीत (बोल्ड) केले. त्‍याने ४ चौकार आणि १ षटकार पटकावत १८ चेंडूत २९ धावा केल्‍या. ४५व्या षटकात न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला. मोहम्मद वसीम ज्युनियरने मार्क चॅपमनला क्लीन बोल्ड केले. त्याला २७ चेंडूत ३९ धावा करता आल्या. ४६ षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ विकेट गमावून ३६० धावा आहेत.

रचिन- विल्यमसन यांची १८० धावांची निर्णायक भागीदारी

पाकिस्तानविरूद्ध रचिन रवींद्रने धडाकेबाज शतक ठोकले आहे. विश्वचषकात तीन शतके झळकावणारा रचिन हा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला. या सामन्यात ८८ चेंडूत त्याने शतक झळकावले. त्‍याला कर्णधार विल्यमसन यांची भक्‍कम साथ मिळाली. त्‍याने ९५ धावा केल्‍या. या दाेघांनी १८० धावांची निर्णायक भागीदारी केली.

न्‍यूझीलंडची सावध सुरुवात

न्यूझीलंडने सावध सुरूवात केली. डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. न्यूझीलंडला पहिला धक्का ११ व्या षटकात ६८ धावांवर बसला. डेव्हॉन कॉनवे ३९ चेंडूंत ३५ धावा करून बाद झाला. त्याला हसन अलीने यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानच्या हाती झेलबाद केले.

न्यूझीलंड संघ : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट

पाकिस्तान संघ : अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, सौद शकील, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news