‘माझी शेवटची स्पर्धा…’ ; जलतरणपटू वीरधवलने जाहीर केली निवृत्ती | पुढारी

‘माझी शेवटची स्पर्धा...’ ; जलतरणपटू वीरधवलने जाहीर केली निवृत्ती

पणजी, पुढारी वृत्तसेवा : कारकिर्दीतील पहिले राष्ट्रीय पदक 2001 मध्ये गोव्यातच जिंकले, आता याच राज्यात होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकासह देशातील स्पर्धात्मक जलतरणातून निवृत्त होत असल्याची घोषणा कोल्हापूरचा अनुभवी ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडे याने येथे केली.

‘मी मनाने अजूनही तरुण आहे; परंतु शरीराला थकवा जाणवत असल्याचे मला वाटते,’ असे सांगत वीरधवलने निवृत्ती जाहीर केली. गोव्यात सध्या 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. वयाच्या 32 व्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर वीरधवल समाधानाने निवृत्त होऊ इच्छित आहे. माझी ही भारतातील शेवटची स्पर्धा आहे. कधीतरी तुम्ही मला प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहू शकाल; मात्र ही माझी शेवटची स्पर्धा आहे, हे निश्चित, असे वीरधवलने सांगितले.

Back to top button