Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने 6 षटकार ठोकून रोहित-कपिल यांची केली बरोबरी

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने 6 षटकार ठोकून रोहित-कपिल यांची केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer : श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 4 धावा करून बाद झाल्यानंतर शुभमन गिल (92), विराट कोहली (88 धावा) आणि श्रेयस अय्यर (82) यांनी केलेल्या शानदार खेळींच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकात 8 विकेट गमावून 357 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात अय्यरने आपल्या डावात 6 षटकार ठोकले आणि त्याने रोहित शर्मा, कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच भारतीय संघाने या सामन्यात 357 धावा करून पाकिस्तानचा 4 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला.

अय्यरने केली रोहित, कपिल देव यांची बरोबरी (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध 82 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 6 षटकार आणि 3 चौकार मारले. या षटकारांसह त्याने रोहित शर्मा आणि कपिल देव यांच्या विक्रमांचीही बरोबरी केली. खरं तर, अय्यर आता रोहित आणि कपिल यांच्यानंतर भारतासाठी विश्वचषकाच्या एका डावात 6 षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

कपिल देवने 1983 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या खेळीत 6 षटकार मारले होते. तर याच वर्षी रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या खेळीत 6 षटकार मारले होते. दुसरीकडे, विश्वचषकातील वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारताचे फलंदाज सौरव गांगुली आणि युवराज सिंग आहेत. ज्यांनी अनुक्रमे 1999 आणि 2007 मध्ये हा पराक्रम केला होता. हे दोन्ही फलंदाज संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत तर श्रेयस आता कपिल आणि रोहितसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या एका डावात भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज (Shreyas Iyer)

7 : सौरव गांगुली विरुद्ध श्रीलंका, टॉंटन, 1999
7 : युवराज सिंग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007
6 : कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स, 1983
6 : रोहित शर्मा विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, 2023
6 : श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, वानखेडे, 2023

भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला

भारताने श्रीलंकेविरुद्ध 50 षटकात 8 विकेट गमावत 357 धावा केल्या आणि आता हा संघ विश्वचषकात एकाही फलंदाजाच्या शतकाविना सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. या सामन्यात भारताकडून एकाही फलंदाजाने शतक झळकावले नाही. याआधी विश्वचषकात शतक न करता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता, ज्यांनी 2019 साली नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध 8 विकेट्सवर 348 धावा केल्या होत्या. आता भारताने पाकिस्तानचा 4 वर्ष जुना विक्रम मोडून पहिला क्रमांक पटकावला आहे.

वैयक्तिक शतकाशिवाय सर्वोच्च सांघिक धावसंख्या (विश्वचषकात)

357/8 : भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई, 2023
348/8 : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, 2019
341/6 : दक्षिण आफ्रिका वि युएई, वेलिंग्टन, 2015
339/6 : पाकिस्तान विरुद्ध युएई, नेपियर, 2015
338/5 : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, स्वानसी, 1983

logo
Pudhari News
pudhari.news