

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून नेदरलॅन्डने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करतानानेदरलँडचा 50 षटकांत 229 धावांवर गुंडाळला. यामध्ये कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 89 चेंडूत 68 धावा केल्या. त्याच्याशिवाय वेस्ली बॅरेसीने 41 आणि सायब्रँडने 35 धावांचे योगदान दिले. लोगान व्हॅन बीकने नाबाद 23, बास डी लीडेने 17 आणि कॉलिन अकरमनने 15 धावा केल्या. आर्यन दत्त नऊ, शरीझ अहमद सहा आणि विक्रमजीत सिंग तीन धावा करून बाद झाला. मॅक्स ओडाड आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शकीब अल हसनला यश मिळाले. (NED vs BAN)
हेही वाचा :