Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित 47 धावा करताच रचणार इतिहास! ‘हा’ विक्रम…

Rohit Sharma
Rohit Sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : लखनौच्या एकना स्टेडियमवर रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येणार आहेत. या लढतीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा दोन विक्रम नोंदवू शकतो. सध्याच्या विश्वचषकात रोहित कर्णधार आणि फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. भारतीय संघाला इंग्लंडला पराभूत करून विश्वचषकात विजयाचा षटकार मारायचा आहे. टीम इंडियाच्या सलग पाच विजयांमध्ये कर्णधार रोहितने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

रोहित होणार 18 हजारी मनसबदार (Rohit Sharma Record)

टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी प्रयत्नशील आहे. रोहित शर्मा या सामन्यात 18000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करू शकतो. हा आकडा गाठण्यासाठी त्याला 47 धावांची गरज आहे. 36 वर्षीय रोहितने आतापर्यंत 456 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 43.36 च्या सरासरीने 17963, तर 52 कसोटीत 3677 धावा केल्या आहेत. तसेच 256 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 10423 धावा असून त्याने 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3853 धावा फटकावल्या आहेत.

तर रोहित 5वा भारतीय ठरणार (Rohit Sharma Record)

रोहितकडे दिग्गज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या क्लबमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे. आतापर्यंत भारताच्या चार फलंदाजांनी 18 हजार किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. रोहितने चालू विश्वचषकात 5 सामन्यात 311 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटमधून 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

रोहित-विराट करतील विक्रम (Rohit Sharma Record)

इंग्लंडविरुद्ध रोहित शर्मा विराटच्या साथीने शिखर धवनसोबतचा विक्रम मोडू शकतो. वास्तविक, रोहित आणि विराट जोडीने गेल्या महिन्यात आशिया कपमध्ये सर्वात जलद 5000 वनडे धावा करण्याचा विक्रम केला होता. आतापर्यंत दोघांनी 90 एकदिवसीय डावात 5183 धावांची भागीदारी केली आहे. या कालावधीत 18 शतके आणि 17 अर्धशतके फटकावली आहेत. हिटमॅन आणि शिखर धवनचा विक्रम मोडण्यासाठी विराट आणि रोहितला फक्त 11 धावांची गरज आहे. रोहित-धवन या जोडीने वनडेत 5193 धावांची भागीदारी केली आहे. सक्रिय खेळाडूंमधील ही सर्वोच्च भागीदारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news