अफगाणविरुद्धच्‍या पराभवानंतर पाकिस्‍तानचा कर्णधार बाबर खूप रडला! : पाकिस्‍तानच्‍या माजी कर्णधाराचा दावा | पुढारी

अफगाणविरुद्धच्‍या पराभवानंतर पाकिस्‍तानचा कर्णधार बाबर खूप रडला! : पाकिस्‍तानच्‍या माजी कर्णधाराचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकदिवसीय विश्‍वचषक (ICC Men’s Cricket World Cup ) स्‍पर्धेतील साखळी सामन्‍यात पाकिस्‍तानचा संघाला अफगाणिस्‍तानने पराभूत केला. या स्‍पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर ठरला. पाकिस्‍तानचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे.अफगाणविरुद्धच्‍या पराभावानंर ड्रेसिंग रुममध्‍ये पाकिस्‍तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) खूप रडला, असा दावा पाकिस्‍तानचे माजी कर्णधार मोहम्‍मद युसूफ यांनी केला आहे.

अफगाणिस्‍तान विरुद्धच्‍या सामन्‍यात पाकिस्‍ताने प्रथम फलंदाजी केली. २८२ धावा केल्‍या. अफगाणिस्‍तानच्‍यला फलंदाजांनी अत्‍यंत व्‍यावसायिक क्रिकेटचे प्रदर्शन करत २८३ धावांचे लक्ष्‍य आठ विकेट्‍स राखून पूर्ण केले. एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानकडून पाकिस्तानचा हा पहिलाच पराभव ठरला. या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमवर चौफेर टीका झाली. पाकिस्तानच्या अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी त्याच्‍यावर तोफ डागली. मात्र पाकिस्‍तानचे माजी कर्णधार मोहम्‍मद युसूफ यांनी बाबरचे समर्थन केले आहे. बाबर हा पराभवाला एकटाच जबाबदार नसल्याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

यात फक्त बाबरची चूक नाही : मोहम्‍मद युसूफ

एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना युसूफ म्‍हणाले की, “मी ऐकले की सोमवारी रात्री अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझम खूप रडला. यात फक्त बाबरची चूक नाही. यात संपूर्ण संघ आणि संघ व्यवस्थापन सहभागी आहे. आम्ही या कठीण काळात आम्ही बाबर आझमसोबत आहोत. संपूर्ण देश त्याच्यासोबत आहे.”

पराभवातून आम्ही शिकवण घेवू : Babar Azam

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमने सादरीकरण सोहळ्यात सांगितले होते की, या पराभवामुळे संघाचे खूप नुकसान होणार आहे. मला आशा आहे की या पराभवातून आम्ही शिकवण घेवू. आम्ही सकारात्मक गोष्टींबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षणात दृष्टीकोन. तुम्हाला धावा थांबवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील आणि तंदुरुस्त राहण्याची गरज आहे. संघात सकारात्मक वातावरण आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्‍याने म्‍हटले होते. “

उपांत्य फेरीत पोहचण्‍यासाठी पाकिस्‍तानसमोर खडतर आव्‍हान

उपांत्य फेरीच्या पात्र होण्‍यासाठी पाकिस्‍तानसमोर खडतर आव्‍हान असणार आहे. या संघाला आता उर्वरित सर्व चार सामने जिंकावे लागणार आहे. तसेच संघाचा धावगतीची सरासरीही कमी आहे. त्यामुळे सर्व सामने जिंकण्याबरोबरच निव्वळ धावगतीही लक्षात ठेवावी लागेल. सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. एवढेच नाही तर संघाला इतर संघांच्या समीकरणांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button