Asian Para Games 2023 Day 2 | एशियन पॅरा गेम्समध्ये भारताची घौडदौड कायम, आतापर्यंत ८ सुवर्णसह २४ पदके | पुढारी

Asian Para Games 2023 Day 2 | एशियन पॅरा गेम्समध्ये भारताची घौडदौड कायम, आतापर्यंत ८ सुवर्णसह २४ पदके

पुढारी ऑनलाईन : चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या एशियन पॅरा गेम्सच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. आजच्या दिवसाची सुरुवात दोन सुवर्णपदकांनी झाली होती. दरम्यान, अजय कुमारने पुरुषांच्या ४०० मीटर-T64 स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. त्याने ५४.८५ च्या उल्लेखनीय वेळ नोंदवत अविश्वसनीय कामगिरी केली. (Asian Para Games 2023 Day 2)

तर अॅथलीट एकता भान हिने महिलांच्या क्लब थ्रो – F32/51 इव्हेंटमध्ये २१.६६ मीटर थ्रोसह कांस्यपदक मिळवले. गजेंद्र सिंगने १:०१.०८४ वेळ पूर्ण करत कॅनोई पुरुष VL2 स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले.

संबंधित बातम्या 

दीप्ती जीवनजी हिने महिलांच्या ४०० मीटर-T20 मध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने ५६.६९ ची वेळ नोंदवत आशियाई पॅरा गेम्समध्ये नवा विक्रम नोंदवला.

सिमरन वत्स हिने महिलांच्या १०० मीटर T12 स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. प्राची यादव हिने महिलांच्या KL2 मध्ये सुवर्ण कामगिरी केली. हे तिचे दुसरे पदक आहे. तर मनीष कौरव याने कॅनोई पुरुष KL3 फायनल स्पर्धेत 44.605 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

पदकतालिकेत भारत ८ सुवर्ण, ८ रौप्य, ८ कांस्य मिळून एकूण २४ पदकांसह चौथ्या स्थानी आहे. चीन ११६ पदकांसह अव्वल स्थानी आहे. (Asian Para Games 2023 Day 2)

हे ही वाचा :

Back to top button