ICC World Cup 2023 | विश्वचषकाचा थरार! इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात आज सलामी लढत | पुढारी

ICC World Cup 2023 | विश्वचषकाचा थरार! इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात आज सलामी लढत

अहमदाबाद; वृत्तसंस्था :  भारतातील बहुचर्चित आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेला आज गतविजेते इंग्लंड व गतउपविजेते न्यूझीलंड यांच्या सलामी लढतीने थाटात प्रारंभ होत आहे. या लढतीच्या माध्यमातून 2019 फायनलची पुनरावृत्ती होत असून चार वर्षांपूर्वी मायभूमीत ऐतिहासिक जेतेपद मिळवणारा इंग्लंडचा संघ येथे पुन्हा एकदा निर्धाराने मैदानात उतरणार आहे. या लढतीला दुपारी 2 वाजता प्रारंभ होईल.  (ICC World Cup 2023)
इंग्लिश संघात एकापेक्षा एक अव्वल मात्र वयस्कर खेळाडूंचे प्रमाण अधिक आहे. मात्र, जोस बटलरचा संघ केव्हाही भारी ठरू शकतो, याची प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला जाणीव आहे. न्यूझीलंडचा संघ अद्याप आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, केन विल्यम्सन व वरिष्ठ गोलंदाज टीम साऊथी येथे खेळणार नसल्याने त्यांना धक्का बसला आहे. विल्यम्सन व साऊथी शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर पूर्ण तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहेत.  (ICC World Cup 2023)
साऊथीला अंगठ्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली आहे. मागील महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या वन डे मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. मात्र, हे त्यांच्या चिंतेचे केवळ हिमनगाचे टोक ठरू शकते. अहमदाबादमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते आणि इंग्लंडकडे एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज आहेत, येथेच दोन्ही संघांत खरा फरक आहे. (ODI world cup 2023)
बेन स्टोक्सने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आपली निवृत्ती मागे घेतली असून तो या स्पर्धेत संघाला पुन्हा एकदा जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. स्टोक्सला अलीकडे गुडघ्याच्या दुखापतीने बरेच सतावले असले तरी मोठ्या स्पर्धेत त्याचा खेळ हमखास बहरतो, हा अनुभव पाहता त्याला कमी लेखण्याची चूक करणे महागडे ठरू शकते. या दिग्गज खेळाडूने 2019 वन डे विश्वचषक व 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलमध्ये आपला वरचष्मा गाजवून दाखवला आहे. (World Cup 2023 Schedule)
याशिवाय, इंग्लंडकडे लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, जो रुट, डेव्हिड मलान यांच्यासारखे अव्वल फलंदाज उपलब्ध आहेत. याशिवाय, यातील बहुतांशी खेळाडूंनी भारतात आयपीएल खेळले असल्याने येथील वातावरणाची त्यांना उत्तम जाणीव आहे. मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम कुरेन यांनी गतवर्षी खेळवल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत उत्तम वरचष्मा गाजवला होता. तेही येथे उल्लेखनीय आहे. गोलंदाजीत मार्क वूड, आदिल रशिद यांच्याकडून त्यांना अपेक्षा असतील. मात्र, जोफ्रा आर्चरची उणीव प्रकर्षाने आर्चरनेच सर्वाधिक बळी घेतले होते. सध्या तो दुखापतीतून सावरत असून राखीव खेळाडू या नात्याने त्याचा संघात समावेश आहे. (World Cup 2023 Schedule)

न्यूझीलंडला दुखापतीची चिंता

केन विल्यम्सन व साऊथी अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याने याचा मोठा फटका बसू शकतो, अशी भीती किवीज गोटात आहे. मात्र, 2015 व 2019 मधील वन डे विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मारलेली धडक आणि 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भरीव कामगिरी ही त्यांची जमेची बाजू आहे आणि यंदा त्यापेक्षा सरस कामगिरी साकारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असणार आहे. (World Cup 2023 Schedule)
डॅरेल मिशेल व डेव्हॉन कॉन्वे यांच्यामुळे सलामीस मजबूत असेल. मात्र, हंगामी कर्णधार टॉम लॅथमचा खराब फॉर्म चिंतेचा ठरू शकतो. या वर्षभरात खेळलेल्या 17 वन डे सामन्यांत त्याला 3 अर्धशतकांसह केवळ 25.93 अशी सरासरी नोंदवता आली आहे. त्यानंतर जेम्स नीशाम व ग्लेन फिलीप्ससारखे हार्ड हिटर या संघात असून आयपीएलमधील त्यांचा अनुभव जमेची बाजू ठरू शकते. विल यंग यंदा वर्षभरात वन डे क्रिकेटमध्ये उत्तम बहरात असून त्याने 14 सामन्यांत 44.46 च्या सरासरीने 578 धावांचे योगदान दिले आहे. (ICC World Cup 2023)

संभाव्य संघ :

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार यष्टिरक्षक), जो रुट, जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम कुरेन, डेव्हिड विली, आदिल रशिद, मार्क वूड, रीस टॉपली, गस अ‍ॅटकिन्सन.
 न्यूझीलंड  : टॉम लॅथम (कर्णधार, यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉन्वे (यष्टिरक्षक), विल यंग, केन विल्यम्सन, मार्क चॅपमन, डॅरेल मिशेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलीप्स (यष्टिरक्षक), रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री. (ODI world cup 2023)
 बक्षीस रक्कम : विजेत्यांना मिळणार 33.25 कोटी रुपये 
 विजेता : 33.25 कोटी 
 उपविजेता : 16.62 कोटी 
 उपांत्य फेरी : 6.64 कोटी 
 साखळी फेरीतील 6 संघ : 83.07 लाख
 प्रत्येक सामन्यातील विजेता : 33.22 लाख 
 एकूण  : 83.06 लाख 
विश्वचषक स्पर्धेत 
सर्वाधिक धावा :
 सचिन तेंडुलकर 2278
सर्वाधिक बळी :
 ग्लेन मॅकग्रा 71
आतापर्यंतचे विश्वविजेते
 ऑस्ट्रेलिया : 1987, 1999, 2003, 2007, 2015
 भारत : 1983, 2011
 विंडीज : 1975, 1979
 श्रीलंका : 1996
 पाकिस्तान : 1992
 इंग्लंड : 2019
 ऑस्ट्रेलिया जेतेपदाचा हॅट्ट्रिक साकारणारा एकमेव संघ
भारताची विश्वचषक स्पर्धांमधील कामगिरी 
खेळलेले सामने : 84
विजय : 53
पराभव : 29
अनिर्णीत : 1
निकाल नाही : 1
भारताच्या 15 खेळाडूंकडे 1458 सामन्यांचा अनुभव 
सहा संघांसाठी सलग 13 वा वर्ल्डकप, अफगाणिस्तान तिसर्‍यांदा तर नेदरलँडस् पाचव्यांदा खेळणार
संघ खेळाडूंचा अनुभव
(एकत्रित सामने)
भारत : 1458
बांगला देश : 1145
इंग्लंड : 1132
ऑस्ट्रेलिया : 1079
न्यूझीलंड : 995
द. आफि—का : 792
अफगाण : 669
श्रीलंका : 637
पाकिस्तान : 601
नेदरलँडस् : 264

यंदा बाऊन्ड्री काऊंटचा नियम नाही!

2019 विश्वचषक स्पर्धेतील फायनलमध्ये चर्चेत आलेला बाऊन्ड्री काऊंटचा नियम यंदा लागू होणार नाही, असे आयसीसीने यापूर्वीच जाहीर केले आहे. फायनल टाय झाल्यानंतर दोन्ही संघांच्या बाऊंड्री काऊंटवर विजेता निश्चित करण्याचा हा नियम वादग्रस्त ठरला होता. यंदा फायनल टाय झाली तर हा नियम लागू असणार नाही. याऐवजी, उभय संघात सुपरओव्हर खेळवली जाईल आणि जोवर निकाल लागत नाही, तोवर सुपरओव्हरच होणार आहे. (ODI world cup 2023)

Back to top button