

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Game 2023 : हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारताने 24 सप्टेंबर रोजी पहिले पदक जिंकले आणि तेव्हापासून विजयाचा सिलसिला कायम आहे. 2018 च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने 570 सदस्यांच्या मजबूत पथकातून 80 पदके मिळवली होती. यंदाच्या स्पर्धेत भारताचे लक्ष्य हे 100 हून अधिक पदक मिळवण्याचे आहे.
भारताने स्पर्धेच्या नवव्या दिवशी सात पदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून चकमदार कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच आणि आठव्या दिवशी 15 पदके मिळाली. यासह भारताची एकूण पदसंख्या 60 पर्यंत पोहचली आहे. यात 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे.