Asian Games 2023 : अब की बार… सेंच्युरी पार..! एशियन गेम्समध्ये भारताचे शंभर पदकांचे टार्गेट

Asian Games 2023 : अब की बार… सेंच्युरी पार..! एशियन गेम्समध्ये भारताचे शंभर पदकांचे टार्गेट
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशियाचे ऑलिम्पिक समजल्या जाणार्‍या एशियन गेम्स स्पर्धा चीनमधील हाँगझाऊ शहरात दि. 23 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. भारताने या स्पर्धेसाठी 39 क्रीडा प्रकारांतील 655 खेळाडू पाठवले आहेत. भारताचे हे आतापर्यर्ंतचे सर्वात मोठे पथक आहे. (Asian Games 2023)

अब की बार… सेंच्युरी पार.. ही या स्पर्धेेसाठी भारतीय चमूची टॅगलाईन असून या स्पर्धेत पदकांचे शतक पार करायचे त्यांचे टार्गेट आहे. यापूर्वी जकार्ता, पालेमबांग स्पर्धेत भारताने 70 पदके जिंकली होती, त्यामुळे देशवासीयांना यंदा शतकपूर्तीची अपेक्षा आहे. या स्पर्धेत भारताला पुढील खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा असेल.

नीरज चोप्रा (भालाफेक)

ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्रा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदकाचा सर्वात मोठा दावेदार आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणार्‍या नीरजला आशियाई स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. नीरज 2018 मध्ये जिंकलेले सुवर्णपदक कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. याशिवाय त्याचे 90 मीटर अंतर पार करण्याचेही लक्ष्य असेल. (Asian Games 2023)

ताजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक)

2018 च्या स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ताजिंदरपाल सिंग तूर हा पुन्हा एकदा त्याच इराद्याने मैदानात उतरणार आहे. व्यक्तिगत प्रकारात आशियाई रेकॉर्ड आपल्या नावावर असलेला हा एकमेव भारतीय आहे. त्याने 21.77 मीटरचे अंतर नोंदवले आहे.

मुरली श्रीशंकर (लांब उडी)

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक हुकल्यामुळे निराश झालेला मुरली श्रीशंकर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासह व्यक्तिगत रेकॉर्ड सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याच्या नावांवर 8.41 मीटरचे रेकॉर्ड असून यामध्ये तो सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय भारताचा जेस्विन एल्ड्रिन हा सुद्धा पदकाचा दावेदार आहे; परंतु जेस्विनला या सत्रात दुखापतींनी ग्रासले असल्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. या दोघांना चिनी तैपेईच्या लिन यु तांगचे आव्हान असेल. (Asian Games 2023)

पारुल चौधरी (3000 मी. स्टीपलचेस)

पारुल चौधरी हिने या सत्रात 9.15.31 अशी वेळ नोंदवली आहे. हा तिचा राष्ट्रीय विक्रम आहे. यामुळे तिच्याकडूनही पदकाची अपेक्षा आहे; परंतु तिला बहारीनच्या विन्फ्रेड मुटिले यावी हिच्याकडून मोठे आव्हान मिळेल. तिने 8.54.29 अशी वेळ नोंदवली असून ती वर्ल्ड चॅम्पियन आहे.

अविनाश साबळे (3000 मी. स्टीपलचेस)

2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील 3000 मी. स्टीपलचेस शर्यतीचा रौप्यपदक विजेता अविनाश साबळेकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. त्याच्या नावावर 8 मिनिटे 11.20 सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम आहे.

स्वप्ना बर्मन (हेप्टाथलॉन)
धावण्याच्या हेप्टाथलॉन प्रकारातील गतविजेती स्वप्ना बर्मन ही यंदा आपल्या पदकाचा बचाव करण्यासाठी प्रयत्नशील असेल. जुलैमध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने पदक मिळवले आहे.

प्रवीण चित्रावेल (ट्रिपल जम्प)

22 वर्षीय प्रवीण चित्रावेल ट्रिपल जम्प प्रकारात 17.37 मीटर अंतर नोंदवून जागतिक सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे त्याला आशियाई स्पर्धेत पदकाचा दावेदार मानले जात आहे; परंतु गेल्या तीन स्पर्धेत त्याची कामगिरी घसरली अन् तो 17 मीटरचे अंतरही गाठू शकला नाही. ऑगस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने पात्रता फेरीत 16.38 मीटरची निराशाजनक अंतराची नोंद केल्याने अंतिम फेरीत जाऊ शकला नाही. (Asian Games 2023)

अजयकुमार सरोज (1500 मीटर धावणे)

आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची वेळ नोेंदवणारा अजयकुमार सरोज हा 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकू शकतो. त्याने ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 3 मिनिटे 38.24 सेकंद अशी स्वत:ची सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. (Asian Games 2023)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news