IND vs AUS ODI series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

IND vs AUS ODI series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या हातात आता इन मिन तीन सामने उरले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 सप्टेेंबरपासून भारत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मायदेशात होणार्‍या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. (IND vs AUS ODI series)

कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने संघ घोषित केला. तीन पैकी पहिल्या दोन सामन्यांसाठी वेगळा संघ निवडण्यात आला आहे, यात अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला असून के. एल. राहुल कर्णधार असणार आहे. शेवटच्या म्हणजे तिसर्‍या वन डेसाठी रोहितसह सर्व वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीसह इतर वरिष्ठ खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर जडेजाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकात फिरकी गोलंदाजांची गरज अधोरेखित झाली आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा एशियन गेम्समध्ये खेळणार्‍या संघाचा कर्णधार आहे; परंतु त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डेसाठी निवडण्यात आले आहे. (IND vs AUS ODI series)

पहिल्या 2 वन डेसाठी टीम इंडिया : के. एल. राहुल (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

तिसर्‍या वन डेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. (IND vs AUS ODI series)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news