भारताचा विजय धडकी भरवणारा : शोएब अख्तर असं का म्‍हणाला? | पुढारी

भारताचा विजय धडकी भरवणारा : शोएब अख्तर असं का म्‍हणाला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताने २६३ चेंडू शिल्लक ठेऊन आणि एकही विकेट न गमावता श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या दमदार कागिरीनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारताचा विजय धडकी भरवणारा असून, आगामी विश्वचषकात टीम इंडिया सर्व चांगली कामगिरी करेल, असे शोएब अख्तर म्हणाला आहे. (Shoaib Akhtar on Team India)

रोहित शर्माच्या कॅप्टनशीपचे शोएबने कौतुक केले आहे. शिवाय, रोहितचे कौतुक करताना त्याने बाबर आझमला खडेबोल सुनावले आहेत. बाबरमध्ये अजून परिपक्वता आलेली नाही. रोहितने गोलंदाजीमध्ये वेळोवेळी चांगल्या प्रकारे बदल केले. गोलंदाजीमध्ये संतुलन आणले. कुलदीप यादवला संघात स्थान देऊन त्याने नेतृत्वगुण दाखवले, असेही शोएब म्हणाला. (Shoaib Akhtar on Team India)

शोएब अख्तर म्हणाला, टीम इंडियाने आशिया चषकात मिळवलेला विजय इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारखे संघ पहात आहेत. आपल्या संतुलित संघासोबत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हा मेसेज टीम इंडियाने इतर संघांना आहे. भारताने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवल्यास आगामी विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये नक्कीच धडक मारेल. मी पाकिस्तानला सांगू इच्छितो की, भारताकडे चांगला मध्यक्रम आहे. विकेट घेणारी फिरकी गोलंदाज आहे. पाकिस्तानला चांगली कामगिरी करण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. (Shoaib Akhtar on Team India)

हेही वाचलंत का?

Back to top button