पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Century : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याने 98 धावा करताच 13 हजार धावांचा टप्पा पार गाठला. याचबरोबरोबर तो सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि सनथ जयसूर्या यांच्यानंतर असा पराक्रम करणारा जगातील पाचवा फलंदाज बनला आहे.
या आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 321 डावात 13 हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराट कोहलीने ही कामगिरी अवघ्या 267 डावात केली आहे. सचिन आणि कोहली यांच्यात 54 डावांचा फरक आहे. विराट कोहली हा 10 हजार, 11 हजार आणि 12 हजार धावा सर्वात वेगाने पूर्ण करणारा खेळाडू आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 278 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने 90 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने वैयक्तिक सर्वोच्च 183 धावांची खेळी पाकिस्तानविरुद्ध साकारली होती. आतापर्यंत त्याने 47 शतके आणि 65 अर्धशतके केली आहेत.
विराट कोहली- 267 डाव
सचिन तेंडुलकर- 321 डाव
रिकी पाँटिंग- 341 डाव
कुमार संगकारा- 363 डाव
सनथ जयसूर्या- 416 डाव
सचिन तेंडुलकर- 18426 धावा
कुमार संगकारा- 14234 धावा
रिकी पाँटिंग- 13704 धावा
सनथ जयसूर्या- 13430 धावा
विराट कोहली- 13024 धावा
कसोटी : 29
एकदिवसीय : 47
टी-20: 01