Virat Kohli vs BCCI : कोहलीला BCCI चा दणका! गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल फटकारले

Virat Kohli vs BCCI : कोहलीला BCCI चा दणका! गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल फटकारले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli vs BCCI : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलाचा लौकिक क्रिकेट जगतात नक्कीच खूप मोठा आहे. पण क्रिकेटव्यतिरिक्त तो त्याच्या मैदानातील आक्रमक कृतींमुळे चर्चेत असतो. अशाच आता एका नव्या वादात पुन्हा एकदा विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावाची भर पडली आहे. गुरुवारी, त्याने त्याच्या सोशल मीडियावर फोटोसह यो-यो टेस्ट आणि त्यात मिळाले गुण शेअर केले. विराटला ते मजेदार वाटले पण बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांना आणि टीम इंडियाच्या (Team India) व्यवस्थापनाला त्याची ही कृती आवडली नसल्याचे समोर आले आहे.

बीसीसीआयच्या कडक सूचना (Virat Kohli vs BCCI)

कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी आणि इतर सोशल मीडिया हँडलवर यो-यो टेस्ट चाचणी आणि त्यात मिळालेल्या गुणांची माहिती शेअर केली. त्याची ही इन्स्टा स्टोरी काही वेळातच व्हायरल झाली होती. पण यामुळे बीसीसीआयचे (BCCI) उच्च अधिकारी नाराज झाले आहेत. रिपोर्टनुसार, विराटने ही गुप्त माहिती शेअर केल्यानंतर तासाभरातच भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्व भारतीय क्रिकेटपटूंसाठी कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यो-यो टेस्ट आणि इतर चाचण्यांबाबतची गुप्त माहिती शेअर न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. असे केल्याने खेळाडूंना त्यांच्या कराराचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले जाऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाने नाव सांगण्या अटीवर म्हटले आहे की, यो-यो टेस्ट (YO YO Test) बाबतची माहिती ही भारतीय संघ व्यवस्थापनाशी संबधीत आहे. ती माहिती गोपनीय आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये, अन्यथा बीसीसीआयकडून कारवाई केली जाईल. सध्यातरी हा इशारा तोंडी देण्यात आला आहे,' असे स्पष्ट केले आहे. (Virat Kohli vs BCCI)

रोहित, विराट आणि हार्दिक यो-यो टेस्टमध्ये उत्तीर्ण

भारतीय संघ आशिया चषकमध्ये 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्याआधी आलूर येथे 6 दिवसीय सराव शिबिरात सर्व खेळाडू सहभागी होत आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शिबिराच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat kohli) यांची यो-यो टेस्ट झाली. तिघेही यात यशस्वी झाले. पण यातील कोहलीने स्वत:च्या टेस्टबद्दल माहिती शेअर केली. ज्यामुळे तो अडचणीत आला.

दरम्यान, जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah), प्रसिद्ध कृष्णा (Prasidha Krishna), संजू सॅमसन (Sanju Samson) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) वगळता भारतीय संघातील जवळपास सर्व खेळाडूंचा या आलूर येथील शिबिरात समावेश आहे. तिघेही आयर्लंड दौऱ्यावर संघासोबत होते, त्यामुळे ते शुक्रवारी, 25 ऑगस्ट रोजी शिबिरात सहभागी झाले. त्यामुळे त्यांना यो-यो चाचणीतून सवलत देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news