Rishabh Pant चे झुंझार कमबॅक, 228 दिवसांनी फटके मारतानाचा व्हिडीओ व्हायरल! | पुढारी

Rishabh Pant चे झुंझार कमबॅक, 228 दिवसांनी फटके मारतानाचा व्हिडीओ व्हायरल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी पंतला मैदानात परतण्यास बराच वेळ लागेल, असे मानले जात होते. मात्र, आता चाहत्यांना मोठी बातमी मिळाली आहे. ऋषभ नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सराव सामन्यादरम्यान पंत फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Rishabh Pant Batting Video)

ऋषभ पंतचा (Rishabh Pant) हा फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंत त्याच्या फलंदाजीदरम्यान काही उत्कृष्ट शॉट्स देखील खेळत आहे. पंत सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात असून त्याची प्रकृती सुधारत आहे. ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा मोठी गर्दी झाली होती. त्याचे क्रिझवर आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. ऋषभ पंतनेही लाँग ऑफच्या दिशेने उंच फटके मारले. त्याच्या शॉटवर मैदानातील चाहत्यांनी जल्लोष केला. सध्या वनडे वर्ल्डपूर्वी पंतच्या पुनरागमनाची शक्यता नाही. मात्र, या वर्षाच्या अखेरीस पंतचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुनरागमन होण्याची शक्यता आहे. (Rishabh Pant Batting Video)

हेही वाचा;

Back to top button